उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन, अनेकांचा पक्ष प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 05:24 PM2021-08-02T17:24:46+5:302021-08-02T17:25:11+5:30

महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर प्रभाग क्रं-१५ मध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन पक्षाच्या शहराध्यक्षा हरकिरण कौर धामी व पक्षाचे गटनेते व सभागृहनेते भारत गंगोत्री यांच्या हस्ते झाले.

Inauguration of NCP party office in Ulhasnagar | उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन, अनेकांचा पक्ष प्रवेश

उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन, अनेकांचा पक्ष प्रवेश

Next

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर प्रभाग क्रं-१५ मध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन पक्षाच्या शहराध्यक्षा हरकिरण कौर धामी व पक्षाचे गटनेते व सभागृहनेते भारत गंगोत्री यांच्या हस्ते झाले. यावेळी असंख्य तरुणांनी पक्षात प्रवेश केल्याची माहिती महासचिव सुनिल पिंपळे यांनी दिली.

 उल्हासनगरात राष्ट्रवादी पक्षाचे अस्तित्व कायम ठेवणारे पक्षाचे गटनेते व सभागृहनेते भारत गंगोत्री यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी रविवारी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतला. कॅम्प नं-४ परिसरात पक्षाचे महासचिव सुनील पिंपळे यांनी जनसंपर्क कार्यालय उघडले असून कार्यालयाचे उदघाटन पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष हरकिरण कौर धामी व पक्षाचे गटनेते व सभागृहनेते भारत गंगोत्री यांच्या हस्ते झाले. यावेळी गायिका निशा भगत, नगरसेविका सुनीता बगाडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. पक्षात येण्यासाठी अनेकांची इच्छा असून महापालिका निवडणुकी पूर्वी वरिष्ठ नेत्याच्या आशीर्वाद प्रवेश सोहळा पार पाडण्यात येणार असल्याची माहिती गंगोत्री यांनी दिली. 

राष्ट्रवादी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालय उडघाटन कार्यक्रमाला संगीतकार शंकर कांबळे, डॉ. संजीवणी कांबळे, पक्षाचे उल्हासनगर शहर विधानसभा अध्यक्ष  दिनेश खैरे, विधानसभा उपाध्यक्ष शेखर खैरनार, प्रतिक खैरे, मिलींद राणे, मिलींद बेलूसे, शाम शिंदे आदीजन उपस्थित होते.

Web Title: Inauguration of NCP party office in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.