मराठा सेवा संघाच्या रौप्य महोत्सवी महाअधिवेशनाचे आज उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2015 03:17 AM2015-12-25T03:17:19+5:302015-12-25T03:17:19+5:30
देशभरातील पदाधिकारी अकोल्यात दाखल, नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती.
अकोला : राज्यात पुरोगामी चळवळींचा आधारस्तंभ बनलेल्या मराठा सेवा संघाच्या रौप्य महोत्सवी महाअधिवेशनाला गुरुवारी शानदार मिरवणुकीने प्रारंभ झाला. शुक्रवार, २५ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या महाअधिवेशनाचे रीतसर उद्घाटन होणार आहे. या महाअधिवेशनासाठी २३ राज्यातील पदाधिकारी गुरुवारी अकोल्यात दाखल झाले. पुढील तीन दिवस येथे विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर मराठा सेवा संघाचे रौप्य महोत्सवी अधिवेशन होत आहे. यानिमित्त गुरुवारी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. शुक्रवारी सकाळी ११ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाअधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर राहतील. यावेळी युवराज छत्रपती संभाजी राजे, स्वागताध्यक्ष नगरविकास, न्याय, विधी व गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, महसूल मंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार, प्रदेश महासचिव मधुकर मेहकरे, मराठा सेवा संघाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष कमलेश पाटील आदी मंचावर उपस्थित राहतील. मराठा सेवा संघाच्या सर्वच कक्षाचे पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित राहतील. मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. रुख्मा राऊत आरोग्य कक्षातर्फे आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात येईल. महाअधिवेशनात दुपारच्या दुसर्या सत्रात ह्यसमाजकारण, राजकारण व उद्योगक्षेत्रात मराठा महिलांचे स्थान, सहभाग आणि उपायह्ण या विषयावर चर्चा होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीमाजी आमदार रेखाताई खेडेकर राहणार असून, यावेळी विविध विभागातील महिला उपस्थित राहतील. दुपारी ४ ते ७ या वेळेत होणार्या तिसर्या सत्रात चर्चासत्राचा विषय ह्यपरदेश व प्रशासकीय सेवा-संधीह्ण हा असून, अध्यक्षस्थानी राज्याच्या जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख राहतील. चौथ्या सत्रात दुपारी ७ ते १0 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमात ह्यसंगीत रजनीह्ण होणार आहे. यावेळी पंडित कल्याणजी गायकवाड, प्रख्यात गायक व संगीतकार, सहकलाकार कार्तिकी गायकवाड झी मराठी सारेगमप लिटिल चॅम्प महाविजेती, रोहित राऊत झी टीव्ही सारेगमप फेम हिंदी महाविजेता, कौस्तुभ गायकवाड ई टीव्ही, गौरव महाराष्ट्राचा महाविजेता, कैवल्य गायकवाड लिटिल चॅम्प फेम बाल गायक, तुकाराम आत्माराम जाधव सुप्रसिद्ध बाल तबला वादक सहभाग घेणार आहेत.