थकित वीजबिल हप्त्याने भरण्यास प्रोत्साहन योजना
By admin | Published: March 18, 2017 12:44 AM2017-03-18T00:44:32+5:302017-03-18T00:44:32+5:30
राज्यातील सार्वजनिक पाणी पुरवठा योजना व उच्च दाब उपसा जलसिंचन योजनेतील ग्राहकांकडे असलेली वीज बिलाच्या थकबाकीची रक्कम हप्त्याने भरुन ग्राहकांना दिलासा
मुंबई : राज्यातील सार्वजनिक पाणी पुरवठा योजना व उच्च दाब उपसा जलसिंचन योजनेतील ग्राहकांकडे असलेली वीज बिलाच्या थकबाकीची रक्कम हप्त्याने भरुन ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने प्रोत्साहन योजना आणली आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एका निवेदनातून दिली.
सार्वजनिक पाणी पुरवठा व उच्च दाब उपसा जलसिंचन योजनांचा थकित वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई सुरुआहे. त्यामुळे संबंधीत शेतकरी व गावकऱ्यांना पाणी पुरवठ्याच्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे सदर विद्युत ग्राहकांना थकबाकीची रक्कम हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात
आल्याचे ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
१६ झोन मधील ४२,०५० वीज जोडण्यांची थकबाकी ९४०.०७ कोटी एवढी आहे. तर व्याजाची रक्कम ५१२.०९ कोटी आहे. एकूण थकबाकीची रक्कम १४५२.१५ एवढी आहे. (विशेष प्रतिनिधी)