काही जातींचा समावेश भटक्या जमातींमध्ये, बहुजन कल्याण विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 02:35 PM2024-08-07T14:35:10+5:302024-08-07T14:35:44+5:30

राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार हडगर या जातीचा समावेश विशेष मागास प्रवर्ग यादीतील अनुक्रमांक ३ (१) कोष्टी जातीची तत्सम जात म्हणून करण्यात आला आहे.

Inclusion of certain castes in nomadic tribes, decision of Bahujan Welfare Department | काही जातींचा समावेश भटक्या जमातींमध्ये, बहुजन कल्याण विभागाचा निर्णय

काही जातींचा समावेश भटक्या जमातींमध्ये, बहुजन कल्याण विभागाचा निर्णय

मुंबई : राज्याच्या इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाने काही जातींचा भटक्या जमातींमध्ये समावेश करण्यास मान्यता दिल्याने या जातींना दिलासा मिळाला आहे. केवट-तागवाले, तागवाली, तागवाले, तागवाला या जातींचा भटक्या जमातींमध्ये (ब) समावेश करण्यात आला आहे. 

राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग यादीत अनुक्रमांक १८२ वर नमूद मायी, बागवान, राईन (बागवान) (मुस्लीमधर्मीय) यांच्यासमोर कुंजडा (मुस्लीमधर्मीय) या जातींचा समावेश करण्यात आला आहे. तर इतर मागासवर्ग यादीतील अनुक्रमांक २६७ वर समाविष्ट असलेल्या चुनारी जातीसमोर चुनेवाला, चुनेवाले या जातींचा भटक्या जमातींमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार हडगर या जातीचा समावेश विशेष मागास प्रवर्ग यादीतील अनुक्रमांक ३ (१) कोष्टी जातीची तत्सम जात म्हणून करण्यात आला आहे. तसेच वंजारी या मुख्य जातीची लाड वंजारी ही पोटजात म्हणून भटक्या जमाती (ड) अनुक्रमांक ३० मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. इतर मागास प्रवर्गातील अनुक्रमांक २२६ वरील भोयर जातीची आजमितीस असलेली दुबार नोंद वगळण्यात आली आहे. हा बदल शासन निर्णयाच्या दिवसापासून (६ ऑगस्ट) लागू करण्यात आला आहे. 
ठेलारी ही जात राज्य सरकारच्या भटक्या जमाती (ब) यादीतील क्रमांक २७ मधून वगळून भटक्या जमाती (क) यादीतील क्रमांक २९ मध्ये धनगर या जातीची तत्सम जात म्हणून समाविष्ट करण्यात आली आहे. 

मागासलेपणाचा सखोल अभ्यास
या संदर्भातील शिफारशी राज्य मागासवर्ग आयोगाने केल्या होत्या. त्यानंतर शिफारशींवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने विचार करून मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाने त्यास मान्यता दिल्यानंतर मंगळवारी शासन निर्णय जारी करण्यात आला. मागासवर्ग आयोगाने सखोल अभ्यास करून राज्य सरकारला शिफारशी केल्या होत्या.

Web Title: Inclusion of certain castes in nomadic tribes, decision of Bahujan Welfare Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.