दीड लाख कोटी उत्पन्न देणा:या प्रवाशांना ठेंगा
By admin | Published: July 9, 2014 02:10 AM2014-07-09T02:10:53+5:302014-07-09T02:10:53+5:30
65 लाख प्रवाशांच्या बहुसंख्य मागण्यांना रेल्वेमंत्र्यांनी केराची टोपली दाखविल्याचे मंगळवारी संसदेत सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात दिसत आह़े
Next
नारायण जाधव - ठाणो
राजधानी मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणा:या उपनगरीय रेल्वे सेवेसह लांब पल्ल्यांच्या मार्गावर वर्षाला सुमारे दीड लाख कोटी रुपये उत्पन्न देणा:या 65 लाख प्रवाशांच्या बहुसंख्य मागण्यांना रेल्वेमंत्र्यांनी केराची टोपली दाखविल्याचे मंगळवारी संसदेत सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात दिसत आह़े
एमयूटीपी-2च्या वाढीव निधीसह सीएसटी-पनवेल, चर्चगेट-विरार एलिव्हेटेड कॉरीडोअर, ठाकुर्ली आणि ठाणो टर्मिनल्स, कोकण रेल्वेचे प्रवेशद्वार असलेल्या दिवा जंक्शनमधील सुविधा, भिवंडीहून थेट मुंबई लोकलसेवा, कळवा-ऐरोली लिंकला वाढीव निधी, डहाणू-नाशिक मार्ग, मुरबाड-नगर मार्गासह पनवेल-कजर्त मार्गाच्या दुपदरीकरणास रेल्वेमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पात वाटाण्याच्या अक्षदा दाखविल्या आहेत़ कोकण रेल्वेमार्गावरील मागण्यांनाही ठेंगा दाखविण्यात आला आह़े
एकीकडे रेल्वेतील सर्वच घटकांचे टप्प्याटप्याने खासगीकरण करण्यात येत आहे. यामुळे पूर्वी 2क् लाख असलेली कर्मचारी संख्या 14 लाखांवर आली आहे. गँगमन आपत्कालीन परिस्थितीत जे काम तीन ते साडेतीन दिवसांत करू शकतात, ते खासगी कंत्रटदार साडेतीन महिन्यांत करू लागले आहेत. या पाश्र्वभूमीवर रेल्वेला तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी खासगीकरणाशिवाय पर्याय नाही, असे सांगून रेल्वेमंत्र्यांनी केवळ मुंबईच नव्हे, भारताची जीवनवाहिनी समजल्या जाणा:या रेल्वेस आणखी समस्यांच्या गर्तेत ढकलले आह़े
नगरविकास मंत्रलयाकडून जेएनएनयूआरएम अंतर्गत मुंबई, ठाणो, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथ, बदलापूर, वसई-विरार या शहरांना मोठा निधी दिला जात आहे. त्याच धर्तीवर रेल्वे मंत्रलय उपरोक्त शहरातील रेल्वेच्या विकासासाठी भरीव निधी देऊन 65 लाख प्रवाशांना न्याय देईल, अशी अपेक्षा होती़ परंतु ती फोल ठरली आह़े
मध्य रेल्वेमार्गावरून सुमारे दीड हजार लोकल अन् 15क् लांब पल्ल्याच्या तर पश्चिम रेल्वेत बाराशे लोकल आणि 15क् लांब पल्ल्याच्या गाडय़ा धावतात. त्यातून 65 लाख प्रवासी प्रवास करतात. त्यांच्याकडून रेल्वेला दररोज सुमारे 4क्क् कोटींचे उत्पन्न मिळत असल्याचे सांगितले जात़े म्हणजेच महिन्याला 12 हजार कोटी तर वर्षाला 1 लाख 44 हजार कोटी रुपये उत्पन्न मिळते.
इतक्या मोठय़ा प्रमाणात उत्पन्न मिळूनही रेल्वे मंत्रलयाने मुंबईसह ठाणो जिल्ह्याला ठेंगा दाखविला आहे. या निधीतून अवघा 1क् टक्के निधी जरी मुंबईला दिला तरी तो 15 हजार कोटींच्या घरात जातो. यातून उपनगरीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलू शकतो. परंतु मुंबई-ठाणो रेल्वे प्रवाशांना रेल्वेमंत्री सदानंद गौडांनी ठेंगा दाखविला आह़े