झवेरी बाजारातील सराफा व्यापा-यांवर आयकर विभागाची छापेमारी
By admin | Published: December 30, 2016 02:28 PM2016-12-30T14:28:43+5:302016-12-30T14:59:09+5:30
काळाबादेवी परिसरातील झवेरी बाजारातील सराफा व्यापा-यांवर आयकर विभागाने छापा टाकत कारवाई केली
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - काळाबादेवी परिसरातील झवेरी बाजारातील सराफा व्यापा-यांवर आयकर विभागाने छापेमारी करत कारवाई केली आहे. नोटाबंदी निर्णयाच्या पार्श्वभूमीवर काळा पैसा पांढरा केल्याच्या आरोपावरुन येथील तीन बड्या सराफा व्यापा-यांवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम बदलल्याचा या व्यापा-यांवर आरोप आहे. आयकर विभागाने मुंबईत केलेली ही मोठी कारवाई आहे.
चेनाजी नरसिंहजी ज्वेलर्स, देव बुलियन आणि श्री बुलियन या तीन ज्वेलर्सवर आयकर विभागाने छापा टाकल्याची माहिती मिळत आहे.
आणखी बातम्या