निवडणूक खर्चावर आयकर विभागाची करडी नजर : जे़ एस़ सहारिया

By admin | Published: February 6, 2017 06:59 PM2017-02-06T18:59:18+5:302017-02-06T18:59:18+5:30

निवडणूक खर्चावर आयकर विभागाची करडी नजर : जे़ एस़ सहारिया

Income tax department's eye on election expenditure: JS Saharia | निवडणूक खर्चावर आयकर विभागाची करडी नजर : जे़ एस़ सहारिया

निवडणूक खर्चावर आयकर विभागाची करडी नजर : जे़ एस़ सहारिया

Next

निवडणूक खर्चावर आयकर विभागाची करडी नजर : जे़ एस़ सहारिया

पंढरपूर : राज्यात होत असलेल्या निवडणुकीतील खर्च विषयक बाबींवर सुक्ष्म निरीक्षण ठेवण्यासाठी आयकर आणि विक्रीकर विभागाकडील अधिकाऱ्यांची नियक्ती करण्यात आली आहे. तसेच रेल्वे, वन विभाग, विमानतळ, सागरी मार्ग या ठिकाणी होणारे संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने तपासणी केंद्र तसेच वेगळी यंत्रणा कार्यान्वित केल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.
पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती देऊन जि़ प़ व पं़ स़ निवडणूक कामाचा आढावा घेतला़
याप्रसंगी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चेन्ने, अतिरिक्त पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, सहा़ पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, उप विभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख, तहसीलदार अनिल कारंडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
निवडूक आयुक्त सहारिया म्हणाले, निवडणूक आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या सर्वच निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विविध उपाय योजना आखून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. लोकांना अपेक्षित असलेली निवडणूक होण्यासाठी राज्य निवडणूक आयोग व जिल्हा प्रशानामार्फत काम केले जात आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी विहित मुदतीत आपल्या खर्चाचा तपशील आयोगाकडे सादर न केल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही आयक्त सहारिया यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाने एक आॅप विकसित केले जाते़ यावर मतदान केंद्राची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. तर उमेदवारास निवडणुकीसाठी केलेल्या खर्चाची माहितीही या अ‍ॅपद्वारे सादर करता येणार आहे. मतदारांना निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची माहिती अवगत होण्यासाठी उमेदवारांच्या शपथ पत्राचा गोषवारा मतदान केंद्राबाहेर मतदारांना सहज दिसेल, अशा स्वरुपात बॅनरवर लावण्यात येणार आहेत. आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे. निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्याचेही आयुक्त सहारिया यांनी सांगितले.
राज्य घटनेने मतदानाचा दिलेला पवित्र हक्क बजावण्यासाठी मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहनही निवडणूक आयुक्त सहारिया यांनी केले. (प्रतिनिधी)
तक्रार निवारण कक्ष २४ तास कार्यरत
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. हे तक्रार निवारण कक्ष २४ तास कार्यान्वित राहणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.

Web Title: Income tax department's eye on election expenditure: JS Saharia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.