शरद पवारांना इन्कम टॅक्सची नोटीस; 2004 ते 20 पर्यंतची निवडणूक प्रतिज्ञापत्रे रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 11:09 PM2022-06-30T23:09:17+5:302022-06-30T23:09:43+5:30

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याची तयारी आधीच पूर्ण झाली होती. त्याशिवाय अचानक सूरत, गुवाहाटी आणि आजचे सत्तांतर या गोष्टी अचानक घडत नाहीत, अशी शंका शरद पवार यांनी उपस्थित केली.

Income tax notice to Sharad Pawar; Election affidavits from 2004 to 2020 on the radar | शरद पवारांना इन्कम टॅक्सची नोटीस; 2004 ते 20 पर्यंतची निवडणूक प्रतिज्ञापत्रे रडारवर

शरद पवारांना इन्कम टॅक्सची नोटीस; 2004 ते 20 पर्यंतची निवडणूक प्रतिज्ञापत्रे रडारवर

googlenewsNext

राज्यातील सत्तानाट्याचा आज एक अंक संपला, उद्यापासून दुसरा अंक सुरु होईल. या साऱ्या घडामोडींवर शरद पवार यांना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद दिल्याचे आश्चर्य वाटले आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत पवार यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. 

राज्यात राजकीय धुळवड सुरु असताना शरद पवारांनाइन्कम टॅक्सची नोटीस आली आहे. मला इन्कम टॅक्सचे प्रेमपत्र आलेय. 2004, 2009, 2014 आणि 2020 मध्ये लढविलेल्या लोकसभा-राज्यसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रांवरून मला नोटीस पाठविण्यात आली आहे, असे शरद पवार म्हणाले. 

राज्यपालांबद्दल सहसा बोलू नये. मी 1966 पासून सगळे राज्यपाल पाहिले. सगळ्यांनी महाराष्ट्राच्या परंपरेत भर घातली या राज्यपालांनी त्यामधे किती भर घातली याचा शोध घ्यावा लागेल, असा टोला शरद पवार यांनी लगावला.  तसेच बंडखोर आमदार शिवसेनेत म्हणजेच ठाकरेंकडे परत येणार नाहीत. कारण त्यांच्यात जी देवाणघेवाण झालीय ती खूप मोठी आहे. जर हे आमदार महाराष्ट्रात कुठेतरी असले असते तर मी काहीतरी करू शकलो असतो, परंतू ते राज्याबाहेर होते, असेही पवार म्हणाले.

तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याची तयारी आधीच पूर्ण झाली होती. त्याशिवाय अचानक सूरत, गुवाहाटी आणि आजचे सत्तांतर या गोष्टी अचानक घडत नाहीत. उद्धव ठाकरे हे सत्तेला चिकटून राहिले नाहीत हे योग्य झाले, असेही पवार म्हणाले. 

Web Title: Income tax notice to Sharad Pawar; Election affidavits from 2004 to 2020 on the radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.