कळंब येथे रुग्णांची गैरसोय

By Admin | Published: May 21, 2016 03:14 AM2016-05-21T03:14:49+5:302016-05-21T03:14:49+5:30

वैद्यकीय अधिकारी दोन महिन्यांच्या रजेवर असल्याने व त्यांच्या जागी नेमणूक करण्यात आलेले प्रभारी अधिकारी देखील रजेवर असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे

Inconvenience of patients at Kalamb | कळंब येथे रुग्णांची गैरसोय

कळंब येथे रुग्णांची गैरसोय

googlenewsNext


नेरळ : कर्जत तालुक्यातील कळंब येथील आदिवासीबहुल प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी दोन महिन्यांच्या रजेवर असल्याने व त्यांच्या जागी नेमणूक करण्यात आलेले प्रभारी अधिकारी देखील रजेवर असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे. गेले अनेक दिवस हे रुग्णालय डॉक्टरांविनाच सुरू असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या भागातील रुग्णांना खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत असून जादा पैसे खर्च करावे लागत आहेत.
नेरळ- कळंब रस्त्यालगत कळंब गावाजवळ हे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. कळंब परिसरातील अनेक ग्रामीण भागातील आदिवासी रुग्ण कमी खर्चात उपचार होतील या आशेने येथे येत असतात. परंतु या रु ग्णालयात आल्यानंतर
रुग्णांची निराशा होत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रावर मागील वर्षी लाखो रु पये खर्च करून रु ग्णालयाची इमारत सुबक केली असली तरी सुविधांचा मात्र पत्ता नाही. हे
रुग्णालय असुविधांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. या रुग्णालयात गोळ्या, औषधांची कमतरता अशा अनेक समस्या आहेत. एक वैद्यकीय अधिकारी रजेवर असताना दुसरा अधिकारी रजेवर जाणे कितपत योग्य आहे असा प्रश्न येथे येणाऱ्या रु ग्णांनकडून उपस्थित के ला जातआहे.
मंगळवारी सकाळी ११ वाजता शिवसेना नेते भरत भगत, कळंब शिवसेना शाखाप्रमुख जनार्दन बदे, नरेश बदे, आसलम पानसरे, मुनिर सयरे, धनेश राणे, विशाल तुपे, समीर तरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिली असता तेथे एकही डॉक्टर हजर नसल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क करून त्यांच्याशी चर्चा केली व त्यांनी लगेचच रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत १७ महसुली गावे व २७ आदिवासी वाड्या असून पोशीर, पाषाणे, कळंब, खांडस, वारे अशी पाच उपकेंद्रे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येतात. परंतु याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे यावरून दिसते. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी आल्यानंतर येथील डॉक्टर औषधे संपली आहेत, ती बाहेरून आणावी लागतील असा सल्ला देतात. मग हे रु ग्णालय सरकारी आहे की, एखादा खासगी दवाखाना असा प्रश्न ग्रामीण व आदिवासी भागातून येणाऱ्या रु ग्णांना पडतो.
वैद्यकीय अधिकारी कर्तव्याचे पालन करत नाहीत अशी तक्र ार नागरिक करत आहेत.(वार्ताहर)
कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पावरा हे दोन महिन्यांसाठी रजेवर आहेत. त्यांच्याजागी कडाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.रमेश कोकरे यांची नियुक्ती के लीहोती. तेही अचानक दोन दिवस न आल्याने त्यांच्या जागेवर डॉ. दिनेश जोशी यांना जाण्यास सांगितले होते. परंतु ते हजर झाले नाहीत. रु ग्णांची गैरसोय होणार नाही अशी व्यवस्था केली जाईल.
- डॉ. सी. के. मोरे, तालुका आरोग्य अधिकारी, कर्जत
सध्या उन्हामुळे सर्वत्र पाण्याचे स्रोत कमी होत आहेत. जे शिल्लक पाणी आहे ते दूषित आहे. यामुळे साथीचे आजार पसरु शकतात. या आजारांना आवरण्यासाठी हे रु ग्णालय सज्ज असायला हवे. परंतु येथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने
रु ग्णालयाची रुग्णसेवा रामभरोसे आहे. त्यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडली तर जिल्हाधिकारी व कार्यकारी अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल.
-भरत भगत, शिवसेना माजी तालुकाप्रमुख
।१७ महसुली गावे
या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत १७ महसुली गावे व २७ आदिवासी वाड्या असून पोशीर, पाषाणे, कळंब, खांडस, वारे अशी पाच उपकेंद्रे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येतात. परंतु याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे यावरून दिसते. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी आल्यानंतर येथील डॉक्टर औषधे संपली आहेत, ती बाहेरून आणावी लागतील असा सल्ला देतात.

Web Title: Inconvenience of patients at Kalamb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.