‘त्या’ शिशूंना दिले चुकीचे इंजेक्शन
By admin | Published: June 1, 2017 03:14 AM2017-06-01T03:14:14+5:302017-06-01T03:14:14+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रूग्णालयातील (पीडीएमसी) एका परिचारिकेने चुकीचे इंजेक्शन दिल्यानेच तीन शिशुंचा मृत्यू झाल्याचा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रूग्णालयातील (पीडीएमसी) एका परिचारिकेने चुकीचे इंजेक्शन दिल्यानेच तीन शिशुंचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार चौकशी समितीच्या अहवालातून उघड झाला आहे. पोलिसांनी संबंधित परिचारिकेला अटक केली आहे. तर, चौथ्या बाळाला सेप्टिसेमिया झाल्याचा निष्कर्ष काढून त्याच्या मृत्यूचे प्रकरण पीडीएमसीने मिटविले होते. तथापि, या बाळाचे शवविच्छेदन करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी बुधवारी दिले.
वैद्यकीय अधीक्षक वसंत लवणकर यांच्या अध्यक्षतेत नेमलेल्या चौकशी समितीने अहवाल दिला. ‘सेप्टिसेमिया’ने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष पीडीएमसी प्रशासनाने काढल्यामुळे चौथ्या बाळाचा मृतदेह पालकांच्या स्वाधीन करण्यात आला होता. इतर तीन बाळांचा मृत्यू चुकीच्या इंजेक्शनमुळे झाल्याचे चौकशी अहवालानंतर स्पष्ट झाले आहे. चौथ्या बाळाच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्याकरिता शवविच्छेदन करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले.
लोकमत कालदर्शिका स्पर्धेबाबत सूचना
लोकमत कालदर्शिका - २०१७ च्या आॅक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ या महिन्यांत मागील पानावर ज्या स्पर्धा जाहीर केल्या आहेत, त्यांच्या प्रवेशिका पाठविण्याची तारीख ३१ जानेवारी २०१८ नमूद करण्यात आली आहे. अनेक ग्राहकांच्या मागणीवरून प्रवेशिका पाठविण्याची तारीख ३० जून २०१७ करण्यात आली आहे. ग्राहकांनी आपल्या प्रवेशिका बदलण्यात आलेल्या तारखेपूर्वी कालदर्शिकेतील कूपनसह पाठवाव्यात.
- संयोजक लोकमत कालदर्शिका
द्वारा लोकमत नागपूर
ंबालरोग विभाग प्रमुख राजेंद्र निस्ताने यांनीही कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना निलंबित केले. हा चौकशी अहवाल पोलिसांकडे सोपवून कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले आहे.
-दिलीप जाणे, अधिष्ठाता, पीडीएमसी