मोतीबिंदूची चुकीची शस्त्रक्रिया करणे भोवले

By admin | Published: November 5, 2015 03:00 AM2015-11-05T03:00:33+5:302015-11-05T03:00:33+5:30

मोतीबिंदूची शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने करून, जंतूसंसर्ग झाल्यावरही योग्य उपचार न करणे डॉक्टरांना चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य

Incorrect surgery of cataract | मोतीबिंदूची चुकीची शस्त्रक्रिया करणे भोवले

मोतीबिंदूची चुकीची शस्त्रक्रिया करणे भोवले

Next

वाशिम : मोतीबिंदूची शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने करून, जंतूसंसर्ग झाल्यावरही योग्य उपचार न करणे डॉक्टरांना चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मुंढे व नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत चव्हाण यांना बुधवारी निलंबित करण्यात आले.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात १५ आॅक्टोबर रोजी आयोजित एका शिबिरामध्ये २२ पेक्षा जास्त रुग्णांवर नेत्ररोग तज्ज्ञांमार्फत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, ही शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे आठ रुग्णांना डोळे गमवावे लागले. या गंभीर प्रकरणाची दखल घेत, आरोग्य मंत्रालयाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे आणि नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रशांत चव्हाण यांना निलंबित केले.
१५ आॅक्टोबर रोजी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना दुसऱ्याच दिवशी घरी पाठविण्यात आले. त्यानंतर डोळ्यात जळजळ होत असल्यामुळे रुग्ण रुग्णालयात परत आले. शस्त्रक्रियेत दोष असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आल्यावर त्यांनी रुग्णांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठवले होते. यामध्ये काही रुग्णांना दृष्टी गमवावी लागण्याची शक्यता लक्षात आल्यावर, त्यांना मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. (प्रतिनिधी)

चुकीच्या पद्धतीने नेत्र शस्त्रक्रिया करणे व जंतूसंसर्ग झाल्यानंतरही योग्य उपचार न केल्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मुंढे व नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे.
- रामचंद्र जाधव, उपसचिव, आरोग्य मंत्रालय, मुंबई

Web Title: Incorrect surgery of cataract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.