राज्यसेवा परीक्षेच्या ८२ जागांमध्ये वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 04:43 AM2019-05-05T04:43:20+5:302019-05-05T04:43:33+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या जागांमध्ये ८२ जागांची वाढ करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रक शनिवारी जाहीर करण्यात आले.
पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या जागांमध्ये ८२ जागांची वाढ करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रक शनिवारी जाहीर करण्यात आले. यापूर्वीच्या जाहिरातीनुसार ३४२ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती. यामध्ये राज्य शासनाकडून नोंदविण्यात आलेल्या मागणीनुसार ८२ जागांची वाढ करण्यात आली असून आता ४२४ जागा भरल्या जाणार आहेत. राज्यसेवेची पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. आता राज्यसेवा मुख्य परीक्षा १३, १४ आणि १५ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुलाखत व निवड अशी प्रक्रिया पार पडणार आहे.
राज्यसेवेच्या परीक्षेत मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग असा वेगळा प्रवर्ग पहिल्यांदाच तयार करण्यात आला आहे. या प्रवर्गांगत ६६ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.