पोलीस भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ
By Admin | Published: February 23, 2016 01:18 AM2016-02-23T01:18:23+5:302016-02-23T01:18:23+5:30
राज्यातील आगामी पोलीस भरतीसाठी वयाची मर्यादा वाढविण्यात आली आहे. गृहमंत्रालयाने संबंधित आदेश जारी केले असून ते पोलीस मुख्यालयाला प्राप्त झाले आहेत. त्यांच्याकडून
मुंबई : राज्यातील आगामी पोलीस भरतीसाठी वयाची मर्यादा वाढविण्यात आली आहे. गृहमंत्रालयाने संबंधित आदेश जारी केले असून ते पोलीस मुख्यालयाला प्राप्त झाले आहेत. त्यांच्याकडून आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
सर्वसाधारण उमेदवारांसाठी वयाची मर्यादा आता २५ वरून २८ वर्षे करण्यात आली आहे तर मागासवर्ग प्रवर्गासाठीची वयोमर्यादा ३० वरून ३३ वर्षे करण्यात आली आहे, अशी माहिती विश्वसनीय पोलीस सूत्रांनी दिली. मार्च महिन्यात पोलीस कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पुरूष उमेदवारांची पाच किलोमीटरऐवजी १,६०० मीटर अंतर धावण्याची स्पर्धा होईल, तर महिलांना तीन किलोमीटरऐवजी ८०० मीटर अंतर धावावे लागेल. दहा दिवस ही भरती प्रक्रिया चालेल. (प्रतिनिधी)