आॅन ड्युटी आत्महत्या वाढल्या

By admin | Published: January 19, 2015 04:23 AM2015-01-19T04:23:55+5:302015-01-19T04:23:55+5:30

कोणत्या ना कोणत्या कारणास्तव कायम बंदोबस्तावर, वेळी-अवेळी जेवण, अपुरी झोप त्यातच वरिष्ठांबरोबर वरचेवर उडणारे खटके

Increase in Aunt Duty Suicide | आॅन ड्युटी आत्महत्या वाढल्या

आॅन ड्युटी आत्महत्या वाढल्या

Next

जमीर काझी, मुंबई
कोणत्या ना कोणत्या कारणास्तव कायम बंदोबस्तावर, वेळी-अवेळी जेवण, अपुरी झोप त्यातच वरिष्ठांबरोबर वरचेवर उडणारे खटके या सर्वांचा कौटुंबिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम या दुष्टचक्रात महाराष्ट्र पोलीस दल अडकले आहे. मग हा ताण असह्य होऊन यातील काही जण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात.
गेल्या आठ वर्षांत २४७ जणांनी आत्महत्या केल्याचे खुद्द गृह विभागाची आकडेवारीच सांगते. यात अनेकांनी ड्युटीवर असतानाच हा अनुचित मार्ग निवडला आहे, हे वास्तव आहे.
जानेवारी २००७ ते डिसेंबर २०१४ या काळात २४७ जणांनी आत्महत्या केली आहे. त्यामध्ये फौजदारपासून आयपीएस दर्जापर्यंतचे ३३ अधिकारी तर कॉन्स्टेबल ते सहायक फौजदारपदापर्यंत २१४ जणांचा समावेश आहे.
या वर्षात ५ अधिकाऱ्यांसह ३९ जणांनी सेवेत असताना आपले आयुष्य संपवले.

Web Title: Increase in Aunt Duty Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.