मुलांच्या धिंडप्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ
By admin | Published: May 24, 2017 01:10 AM2017-05-24T01:10:19+5:302017-05-24T01:10:19+5:30
मुलांचे मुंडन करून धिंड काढणाऱ्या आरोपीच्या पोलीस कोठडीत २६ मे पर्यंत वाढ झाली आहे. तसेच दोन्ही मुलांसह कुटुंबाचे मुंबई विद्यापीठातील मानसोपचार
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर: मुलांचे मुंडन करून धिंड काढणाऱ्या आरोपीच्या पोलीस कोठडीत २६ मे पर्यंत वाढ झाली आहे. तसेच दोन्ही मुलांसह कुटुंबाचे मुंबई विद्यापीठातील मानसोपचार विभागाचे प्रमुख डॉ. गौतम गवळी समुपदेशन करणार असल्याची माहिती प्रा. प्रशांत इंगळे यांनी दिली. चकली खाल्याच्या रागातून दोन लहान मुलांचे मुंडन करून विवस्त्र ध्ािंड काढली. याप्रकाराने मुलांसह कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे. त्यांना या धक्यातून बाहेर काढण्यासाठी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश प्रभारी प्रा. इंगळे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी डॉ. गवळी यांच्याशी संपर्क साधून मुलांचे समुपदेशन करण्याची विनंती केली. डॉ. गवळी शुक्रवारी उल्हासनगरला येणार आहेत. दरम्यान, आरोपी महमूद पठाण यांच्यासह त्याची मुले इरफान व तौलिक यांना न्यायालयाने २६ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.