महाराष्ट्र सदन घोटाळा, छगन व समीर भुजबळांच्या कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2016 05:56 AM2016-08-25T05:56:50+5:302016-08-25T05:56:50+5:30
छगन भुजबळ व समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ सप्टेंबरपर्यंत विशेष न्यायालयाने वाढ केली.
मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी व माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ व समीर
भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ सप्टेंबरपर्यंत विशेष न्यायालयाने वाढ केली. सध्या हे दोघेही आर्थररोड जेलमध्ये आहेत.
छगन भुजबळ यांनी या पूर्वी तब्येतीचे कारण पुढे करत, जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, विशेष न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. त्या पाठोपाठ उच्च न्यायालयानेही त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. आता भुजबळ यांनी थेट पीएमएलएमधील काही तरतुदींना आव्हान देत, आपल्याला बेकायदेशीरपणे अटक करण्यात आल्याचे म्हणत, पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (प्रतिनिधी)