धरणातील साठा वाढता वाढेना...

By Admin | Published: July 14, 2017 01:32 AM2017-07-14T01:32:09+5:302017-07-14T01:32:09+5:30

जून महिन्याच्या सुरुवातीला भोर तालुक्यासह भाटघर, नीरा-देवघर धरणांच्या पट्ट्यात पावसाने चांगली सुरुवात केली होती़

Increase in dam damages ... | धरणातील साठा वाढता वाढेना...

धरणातील साठा वाढता वाढेना...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नेरे : जून महिन्याच्या सुरुवातीला भोर तालुक्यासह भाटघर, नीरा-देवघर धरणांच्या पट्ट्यात पावसाने चांगली सुरुवात केली होती़ यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत चालली होती़ मात्र मागील आठवड्यापासून पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने पाणीसाठ्यातील वाढ ठप्प झाली आहे. आजच्या स्थितीला भाटघर धरणात सहा टीएमसी, तर नीरा देवघर धरणात साडेतीन टीएमसी पाणीसाठा आहे़.
तालुक्यातील भाटघर, नीरा-देवघर धरण परिसरात अत्यल्प पाऊस पडत असल्याने धरणसाखळीत आजअखेर समाधानकारक पाणीसाठा नाही़ यामुळे या धरणांच्या पाण्यावर अवलंबून आसणारे पूर्वेकडील शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तालुक्याच्या डोंगर माथ्यावर पडणाऱ्या पावसापेक्षा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अधिक पाऊस पडत होता़ मात्र आठ दिवसांपासून पावसाची विश्रांती वाढत चालल्याने परिसरातील भातरोपे करपत चालली आहेत, तर धरणांच्या पूर्वेकडील भागात शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत़ तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़
>लोकमत न्यूज नेटवर्क
वेल्हे : वेल्हे तालुक्यातील साठवण क्षमतेने सर्वात मोठे असणाऱ्या पानशेत धरणाच्या खोर्यात मागील दि.२५ जून ते ५ जूलै दरम्यान झालेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात कांही आंशी भर पडली आहे. मात्र ५ जुलैपासून पावसाचा जोर कमी झाल्याने पानशेत धरणात येणार्या पाण्याचा वेग आतिशय मंदावला आहे. परिणामी धरणसाठ्यात जलद गतीने होणारी वाढ कमी झाली आहे. दि. १३ जुलैअखेर धरणात ४६.८७% पाणी आहे. वेल्ह्यानजीक असाणार्या कानंदी नदीवरील गुंजवणी धरणातही पाणीसाठ्यात काहीशी वाढ होऊन सध्या पाणी २८.३६% पाणी असून वाढ स्थिर झाली आहे. तसेच मोसे नदी खोयार्तील वरसगाव धरणसाठ्यातही पाण्याची भर होण्याचा वेग मंदावला आहे. सध्या वरसगाव धरणात २१.०४ एवढे पाणी आहे. तर टेमघर धरणातही पाणी पातळीत मागील आठवड्यापासून विशेष वाढ झाली नसून येथे ७.९६ %पाणी आहे. तर खडकवासला धरणात २५.५१% पाणीसाठा शिल्लक आहे.
पुणे शहराला पाणिपुरवठा करणा?्या खडकवासला धरण साखळीत खडकवासला धरणाच्या आगोदर पानशेत, वरसगाव, टेमघर ही धरणसाखळी असून वेल्हे तालुक्यात पडणार्या पावसावर पानशेत आणि वरसगाव ही दोन धरणे भरतात. तर टेमघर धरण मुळशी तालुक्यात येते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी या साखळीत पाण्याची वाढ होण्याची गती मंदावली आहे.
आंबी नदी खोरे, मोसे नदी खोरे, पानशेतचा कोकणालगत रायगड जिल्ह्यानजीकचा अतिदुर्गम पश्चिम पट्टा या भागात मागील सप्ताहापासून पावसाने उघडझाप करण्याचे धोरण अवलंबले असल्याने धरणाकडे पाणी येण्याचा वेग कमी झाला आहे. १ जूनपासून पानशेत धरण खोऱ्यात ६०९ मि.मी., वरसगाव ६३० मि.मी., टेमघर ४ मि.मी., खडकवासला ७ मि.मी. अशी पावसाची नोंद झाली आहे.
पानशेत धरणाची क्षमता १०.६५ टीएमसी आहे. दि.१३ जुलैअखेर धरणात ४.९९ टीएमसी साठा आहे. तर वरसगाव धरणाची क्षमता १२.८२ टीएमसी आहे व सध्या २.७०टीएमसी पाणी शिल्लक आहे. तर टेमघर ची क्षमता ३ टीऐमसी असून सध्या ०.३०% पाणी आहे. तर शेवटच्या खडकवासला धरणाची क्षमता १.९९ टीएमसी असून सध्या ०.५१% पाणी शिल्लक आहे.

Web Title: Increase in dam damages ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.