‘शिक्षकांना महागाई भत्ता वाढ द्या’
By admin | Published: March 28, 2016 02:14 AM2016-03-28T02:14:32+5:302016-03-28T02:14:32+5:30
केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलने केली आहे. यासंदर्भातील निवेदन
मुंबई : केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलने केली आहे. यासंदर्भातील निवेदन
सेलचे उपाध्यक्ष महादेव सुळे यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.
सुळे म्हणाले की, केंद्र सरकारने १ जानेवारी २०१६ पासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ११९ टक्क्यांवरून १२५ टक्क्यापर्यंत वाढ केली आहे. मात्र राज्य सरकारने यासंदर्भातील कोणताही निर्णय घेतलेला नाही. मुळात कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि जुलै अशी वर्षातून दोन वेळा वाढ मिळणे अपेक्षित असते. मात्र सरकारने अद्याप जानेवारीची वाढ दिलेली नाही. तत्काळ महागाई भत्ता वाढ देण्याची मागणी सुळे यांनी केली आहे; नाहीतर सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)