दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ

By admin | Published: September 13, 2016 05:01 AM2016-09-13T05:01:25+5:302016-09-13T05:01:25+5:30

दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्कात ७५ रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मार्च २०१७ च्या परीक्षेपासून ही वाढ लागू होणार आहे.

Increase in the examination fee of Class XII | दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ

दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ

Next

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्कात ७५ रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मार्च २०१७ च्या परीक्षेपासून ही वाढ लागू होणार आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे म्हणाले, की राज्य मंडळाला परीक्षांचे नियोजन, अंमलबजावणीची तयारी, दळणवळण ,परीक्षा साहित्य आणि छपाईच्या साहित्यासाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. मंडळाने यापूर्वी २०११ मध्ये शुल्कवाढ केली होती. त्यानंतर पाच वर्षांनी ही शुल्कवाढ केली आहे. दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे शुल्क ३०० रुपयांवरून ३७५ रुपये करण्यात आले आहे. तर बारावीचे शुल्क ३२५ वरून ४०० रुपये केले आहे. प्रशासकीय शुल्क, गुणपत्रिका शुल्क, लॅमिनेशन, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क वेगळे घेतले जाणार आहे.


२०१७ च्या परीक्षेपासून लागू होणार नवी शुल्क वाढ
नियोजन, अंमलबजावणी, परीक्षा साहित्य आणि छपाई खर्च वाढल्याने मंडळाचा निर्णय

Web Title: Increase in the examination fee of Class XII

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.