खाद्यतेलांवरील आयात शुल्क वाढवा

By admin | Published: July 14, 2017 05:18 AM2017-07-14T05:18:12+5:302017-07-14T05:18:12+5:30

तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने खाद्य तेलांवरील आयात शुल्क वाढवावे

Increase the import duty on edible oil | खाद्यतेलांवरील आयात शुल्क वाढवा

खाद्यतेलांवरील आयात शुल्क वाढवा

Next

विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात तेलबियांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने खाद्य तेलांवरील आयात शुल्क वाढवावे, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे.
क्रूड पामतेलावरील आयात शुल्क हे सन २०००मध्ये १६ टक्के इतके तर २००१मध्ये ते ७५ टक्के इतके होते. २००० ते २०१३ या कालावधीत क्रूड पाम तेलावरील आयात शुल्क अडीच टक्के ते पासष्ट टक्के यादरम्यान बदलते होते. २०१५पासून ते साडेसात टक्के ते साडेबारा टक्के यादरम्यान असून, त्याच्या कमी प्रमाणामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोयाबीनचा दर २०१४मध्ये प्रति क्विंटलला ३८००, २०१५ मध्ये ३५००, सन २०१६मध्ये ३४५० तर सध्या ते २७०० ते २९०० यादरम्यान घसरले आहेत. यंदाच्या खरीप हंगामासाठी सोयाबीनसाठी किमान आधारभूत किंमत ३०५० इतकी निश्चित करण्यात आली आहे. तेलबियांवरील आयात शुल्काचा देशांतर्गत बाजारातील तेलबियांच्या दरावर थेट परिणाम होत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावरील आयातशुल्क वाढविण्याची गरज आहे. यासंदर्भात निर्णय घेतल्यास राज्याच्या तिजोरीवर कोणताही बोजा पडणार नसून किमान आधारभूत दराने राज्य सरकारला तेलबियांची खरेदी करणे सुलभ होणार आहे. आयातशुल्क वाढविल्यामुळे ग्राहकांना कोणताही फटका बसणार नाही. तसेच सरकारलाही आठ हजार कोटींचे जास्तीचे अबकारी शुल्क प्राप्त होऊ शकेल. तसेच किमान आधारभूत दरापेक्षा कमी दराने खरेदी करावी लागल्यास दोन ते तीन हजार कोटींची बचतही होऊ शकेल. त्यामुळे कच्च्या खाद्यतेलांवरील आयातशुल्क ३५ टक्के तर रिफार्इंड खाद्यतेलावरील आयातशुल्क ५० टक्के इतके वाढविण्यात यावे, अशी मागणी या पत्रात मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
>तेलबियांच्या दरावर थेट परिणाम
तेलबियांवरील आयात शुल्काचा देशांतर्गत बाजारातील तेलबियांच्या दरावर थेट परिणाम होत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावरील आयातशुल्क वाढविण्याची गरज आहे.

Web Title: Increase the import duty on edible oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.