आयटीआयच्या जागांमध्ये वाढ; ७ हजार जागांसाठी प्रवेश प्रक्रिया उद्यापासून
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 05:58 AM2020-07-31T05:58:09+5:302020-07-31T05:58:21+5:30
आयटीआय महाविद्यालये कधी सुरू होतील याबाबत लॉकडाऊनसंदर्भात शासन नियमास अनुसरून नंतर माहिती जाहीर करण्यात येईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीयभूत आॅनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. यंदा या जागांमध्ये सात हजार १४० जागांची वाढ झाली आहे. १ ऑगस्ट २०२० पासून प्रवेश https://admission.dvet.gov या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात उपलब्धअसून प्रवेशासाठी एकूण १ लाख ४५ हजार ५३२ जागा आहेत.
आयटीआय महाविद्यालये कधी सुरू होतील याबाबत लॉकडाऊनसंदर्भात शासन नियमास अनुसरून नंतर माहिती जाहीर करण्यात येईल. सध्या फक्त प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने सुरू करत असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण, प्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे.
राज्यात ३५८ तालुक्यांत ४१७ शासकीय आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ९२ हजार ५५६ इतकी आहे. आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था, अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी ४ उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी २ स्वतंत्र संस्था व ४३ शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी १५ तर २८ आदिवासी (आश्रमशाळा) आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे. तसेच राज्यात ५६९ खासगी आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ५३ हजार २७२ आहे.
शासकीय आणि खासगी ९८६ आयटीआय असून त्यांची एकूण प्रवेशक्षमता १ लाख ४५ हजार ५३२ विद्यार्थी आहे. नव्याने आॅनलाइन प्रवेश अर्ज करण्यासाठी १ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर काळात मुदत दिली जाईल आणि २१ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजता समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
तसेच जिल्हानिहाय समुपदेशन फेऱ्या २१ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या दरम्यान पार पडणार असून खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थास्तरावरील प्रवेश १६ आॅगस्टपासून पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक (सकाळी ११ ते सायं. ५ पर्यंत)
च्आॅनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे व प्रवेश अर्ज शुल्क भरणे - १ आॅगस्ट ते १४ आॅगस्ट
च्पहिल्या फेरीसाठी संस्थानिहाय प्राधान्य सादर करण्यासाठी नोंदणी करून लॉगइन आयडी व पासवर्ड सादर करणे - २ आॅगस्ट ते १४ आॅगस्ट
च्प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे व उमेदवारांना एसएमएसद्वारे कळविणे - १६ आॅगस्ट (सकाळी ११ वाजता)
च्गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे आणि माहितीत बदल करणे - १६ आणि १७ आॅगस्ट
च्अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे - १८ आॅगस्ट (सायं. ५ वाजता)
विभागनिहाय प्रवेश क्षमता
विभाग सरकारी आयटीआय खाजगी आयटीआय एकूण
आयटीआय प्रवेश आयटीआय प्रवेश आयटीआय प्रवेश
संख्या क्षमता संख्या क्षमता संख्या क्षमता
मुंबई ६७ १६०७६ ३९ ३८७२ १०६ १९९४८