रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत वाढ
By admin | Published: June 25, 2016 02:10 PM2016-06-25T14:10:45+5:302016-06-25T14:11:38+5:30
गेल्या 72 तासांपासून रायगड जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमूळे जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.
Next
>जयंत धुळप / दि.25(अलिबाग)
गेल्या 72 तासांपासून रायगड जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमूळे जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.
शनिवारी सकाळी आठ वाजताच्या नोंदींनूसार नद्यांची जलपातळी मिटर मध्ये खालील प्रमाणे,
अ.क्र. नदी सद्य जलपातळी धोकादायक जलपातळी
01 सावित्री 1.90 6.50
02 पाताळगंगा 16.12 21.52
03 उल्हास 42.30 48.70
04 गाढी 1.10 6.55
05 कुंडलिका 22.20 23.95
शनिवारी दुपारी 3.45 वाजता सुद्रास भरती असल्याने नद्यांच्या पाण्याचा निचरा समुद्राकडे वेगाने होत नसल्याने नद्यांच्या या जलपातळीत वाढ आहे. संध्याकाळी समुद्रास आेहाेटी लागल्यावर नदी जलपातळी खाली येणे अपेक्षित आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या 72 तासांपासून पावसाचा जोर कायम असून, शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात रायगड जिल्ह्यात म्हसळा येथे जिल्ह्यातील सर्वाधिक 192 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याच चोवीस तासात जिल्ह्यात एकुण 1697.90 मिमी पाऊस झाला असून हे सरासरी पर्जन्यमान 106.12 मिमी आहे. गतवर्षी याच दिवशी हा एकुण पाऊस 310 मिमी हाेता व त्यावेळी सरासरी पर्जन्यमान 19.38 मिमी हाेते. दरम्यान जिल्ह्यातील एकुण अपेक्षीत पावसा पैकी 11.29 टक्के पाऊस पूर्ण झाला आहे.
शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोविस तासात रायगड जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी रोहा-135, पेण-135, अलिबाग-134, सुधागड-130, माणगांव-125, श्रीवर्धन-112, तळा-107, मुरुड-105, महाड-105, उरण-102, खालापूर-83,
पनवेल-80.40, पोलादपुर-59, माथेरान-49, कर्जत- 44.50 मिमी पावसाची नोंद झाली आहे.