वाशिम जिल्ह्यात दुधसंकलनात वाढ
By admin | Published: May 10, 2014 09:48 PM2014-05-10T21:48:53+5:302014-05-10T21:51:22+5:30
शासकीय दुधसंकलन केंद्रात वाढ झाली आहे.
वाशिम : मागील वर्षीच्या जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात स्थानिक शासकीय दुधसंकलन केंद्रात जिल्हयातील दुध उत्पादक सहकारी संस्थांकडून पुरवठा करण्यात आलेल्या दुधाच्या तुलनेत यावर्षी याच चार महिन्याच्या कालावधीत दुध उत्पादक सहकारी संघाकडून करण्यात येत असलेल्या दुधपुरवठयात वाढ झाली आहे.
विशेषत एप्रिल महिन्यात सामान्यात : दुध संकलनात दरवर्षी घट असल्याचा सार्वत्रिक अनुभव असताना वाशिमच्या शासकीय दुधसंकलन केंद्रात गतवर्षीच्या तुलनेत प्रतिदिनी सरार्स एक हजार लीटरएवढी वाढ झाली आहे. जिल्हयात वाशिम व कारंजा येथे १0 हजार लीटर सावठवण क्षमतेची प्रत्येकी एक या प्रमाणे शासकीय दुधशितीकरण केंद्रे आहेत. या केंद्रामध्ये सन २00३ पर्यंत प्रतिदिनी प्रत्येकी पाच हजार लीटर एवढे दुधसंकलन होत होते.पंरतु, नंतरच्या काळात वारंवार दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यामुळे दुग्धोत्पादनात घट झाली तसेच विविध कारणामुळे अनेक दुध उत्पादक सहकारी संस्थांची आर्थिक स्थिती ढासळली.त्यामुळे त्याचाही शासकीय दुधसंकलन केंद्राला केल्या जाणार्या दुधपुरवठयावर परिणाम झाला. वाशिम व कारंजा येथील शासकीय दुधशितीकरण केंद्राला होणार्या दुधपुरवठयात झपाटयाने घट होत गेली वाशिमचे शासकीय दुधशितीकरण केंद्र कसेबसे सुरु राहीले परंतु, कारंजा येथील शासकीय दुधशितीकरण केंद्र कालांतराने बंद पडले ते आजही बंद आहे. वाशिमच्या शासकीय दुधसंकलन केंद्रातील दुधशितीकरण केंद्रातील दुधसंकलन २00५ -0६ मध्ये अवघ्या एक हजार लीटर एवढे कमी झाले होते.त्यानंतर पंतप्रधान पॅकेजमधून जिल्हाप्रशासनाकडून व पशुसंवर्धन विभागाकडून विशेष घटक योजनेतून जिल्हयात गायी, म्हशीचे मोठया प्रमाणात वाटप करण्यात आल. महानंदच्या योजनेतूनही गायी म्हशीचे वाटप करण्यात आले तसेच २00९ पासून अजूनही जि.प. पशुसंवर्धन विभाग व उपायुक्त पशुसंवर्धन यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून विविध योजनांमधून शेतकर्यांना अनुदानावर गायी व म्हशीचे वाटप करण्यात येत आहे. परिणामी जिल्हयात दुग्धोत्पादनात वाढ झाली आहे. मागीलवर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्याच्या काळात वाशिमच्या शासकीय दुधशितीकरण केंद्रात दुधउत्पादक सहकारी संस्थाकडून सरासरी २७00 लीटर प्रतिलिटरने दुधाचे संकलन झाले होते. चालुवर्षी याच चार महिन्याच्या काळात प्रतिदिन सरासरी ३२५0 लीटर एवढे संकलन झाल्याची नोंद आहे. सध्या शासकीय दुधखरेदीत घेतल्या जाणार्या गायीच्या ४.0 फॅट असलेल्या दुधाला २१ रुपये ५0 पैेस लीटर तर म्हशीच्या ६.५ फॅट असणार्या दुधाला ३0 रुपये ५0 पैसे प्रती लिटरचा भाव मिळत आहे. गायीच्या ४.0 फॅटपेक्षा जास्त प्रत्येक पाईटला व म्हशीच्या ६.५ फॅटपेक्षा जास्त प्रत्येक पाईटला ३0 पैसे प्रमाणे जास्त दर दिला जात आहे.