युरियाच्या किमती वाढविणार
By admin | Published: June 9, 2014 11:46 PM2014-06-09T23:46:39+5:302014-06-09T23:46:39+5:30
युरिया खताची किंमत 1क् टक्क्यांनी वाढविण्याचा केंद्र सरकारचा विचार असून, खतावरील सबसिडी कमी करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात येणार आहे.
Next
>मुंबई : भारतीय शेतकरी ज्या खतांचा मोठय़ा प्रमाणावर वापर करतात, त्या युरिया खताची किंमत 1क् टक्क्यांनी वाढविण्याचा केंद्र सरकारचा विचार असून, खतावरील सबसिडी कमी करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात येणार आहे. सरकारी अधिका:यांनी दिलेल्या माहितीनुसार चार वर्षातील हा मोठा निर्णय ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युरिया खताचा अतिरिक्त वापर कमी करायचा असून, अर्थव्यवस्थेवरील सबसिडीचा ताणही कमी करायचा आहे. युरिया खताच्या किमतीत 2 वा 3 टक्के वाढ केल्यास त्याचा सबसिडीवर फारसा परिणाम होणार नाही. त्यामुळे युरिया खताची किंमत किमान 1क् टक्के वाढवावी, असा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.
उल्लेखनीय म्हणजे, खतमंत्री अनंतकुमार यांचा या निर्णयाला पाठिंबा आहे. या संदर्भात अधिका:यांनी युरिया किंमत वाढविण्याचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मांडण्याची तयारी करावी किंवा जुलैमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या वतीने मांडण्यात येणा:या अर्थसंकल्पात त्याचा समावेश करावा, असे अनंतकुमार यांनी म्हटले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीस मुंबई शेअर बाजाराच्या उच्चंकात चंबळ खते व रसायने कंपनीला 6.6 टक्के नफा मिळाला असून, टाटा केमिकलला 2.6 टक्के नफा मिळाला आहे. युरियावरील सबसिडी गेल्या 1क् वर्षात चारपटीने वाढली आहे, कारण याआधीच्या सरकारने या खताच्या किमती उत्पादन खर्चापेक्षाही कमी ठेवल्या, शेतक:यांना खुश ठेवण्यासाठी घेतलेला हा निर्णय अर्थसंकल्पावर बोजा वाढविणारा ठरला आहे.
नैसर्गिक वायूची किंमत वाढविल्यास युरियाची किंमत वाढवावीच लागणार आहे. सरकारला हा निर्णय घ्यावाच लागणार आहे. तो बजेटआधी घ्यायचा की बजेटमध्ये मांडायचा एवढाच निर्णय बाकी आहे. 1 जुलैपासून नैसर्गिक वायूच्या किमती वाढविल्या जाणार आहेत. खते व रसायन मंत्रलयाने या वृत्तावर प्रतिक्रिया दिली नाही.
(प्रतिनिधी)
4नैसर्गिक वायूची किंमत दुप्पट करण्याचा निर्णय सरकारला घेणो भाग पडणार आहे. युरिया खताच्या निर्मितीत नैसर्गिक वायूचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो व युरियाच्या किमतीत वायूचा वाटा चार पंचमांश इतका असतो.
4नायट्रोजनयुक्त खते भारतात अर्धेअधिक शेतकरी वापरतात. भारतात वापरल्या जाणा:या खतावरील सबसिडीत या खतांची सबसिडी 11 अब्ज डॉलरची असते.