उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात वाढ!, उद्दिष्टापेक्षा ९४८ कोटींची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 05:29 AM2018-04-30T05:29:57+5:302018-04-30T05:29:57+5:30
राज्यात मद्याच्या वापरात घट झालेली असताना मुंबई व ठाण्यामध्ये त्याचा वापर वाढला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने परराज्यातून येणाऱ्या मद्यावर
मुंबई : राज्यात मद्याच्या वापरात घट झालेली असताना मुंबई व ठाण्यामध्ये त्याचा वापर वाढला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने
परराज्यातून येणाऱ्या मद्यावर आळा घालण्यात चांगले यश मिळवल्याने, राज्यातील वितरकांनी केलेल्या मद्यविक्रीतून मिळणाºया महसुलामध्ये वाढ झाली आहे.
राज्याचे उद्दिष्ट १२ हजार ५०० कोटी होते, पण प्रत्यक्षात १३ हजार ४४८ कोटी रुपयांचा महसूल जमवण्यात विभागाला यश आले. त्यामुळे उद्दिष्टापेक्षा ९४८ कोटी रुपये जास्त महसूल जमा झाला
आहे.
मुंबई शहराचे उद्दिष्ट १२३ कोटी, उपनगरचे ३७७ कोटी व ठाण्याचे २०१ कोटी होते. प्रत्यक्षात मुंबईतून ११३ कोटी, उपनगरातून ३०६ कोटी व ठाण्यातून १९० कोटी रुपये महसूल गोळा करण्यात आला आहे.
सन २०१८-१९ या वर्षासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने १५ हजार ३४३ कोटी रुपये महसूल जमवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते सहजपणे साध्य करू, असा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केला.
परराज्यातून बेकायदा विक्री होणाºया मद्यावर विभागाने लक्ष ठेवले व असे प्रकार रोखण्यात यश मिळवले. त्यामुळे मद्याची खरेदी राज्यातील वितरकांकडून करावी लागली. परिणामी, राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलामध्ये लक्षणीय वाढ झाल्याची माहिती विभागातील सूत्रांनी दिली.