उन्हाळी सुट्टीमुळे एसटीच्या फे-यांमध्ये वाढ

By admin | Published: May 2, 2017 03:52 PM2017-05-02T15:52:10+5:302017-05-02T15:52:10+5:30

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागामार्फत स्वारगेट बसस्थानकातून दादर व बोरिवलीसाठी बसच्या फे-यांमध्ये वाढ करण्यात आलीय.

An increase in ST fares due to summer vacations | उन्हाळी सुट्टीमुळे एसटीच्या फे-यांमध्ये वाढ

उन्हाळी सुट्टीमुळे एसटीच्या फे-यांमध्ये वाढ

Next

 ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 2 - उन्हाळी सुट्टीमुळे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागामार्फत स्वारगेट बसस्थानकातून दादर व बोरिवलीसाठी बसच्या फे-यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. 
 
महाराष्ट्र दिनापासून स्वारगेट बसस्थानकातून दादरसाठी दर अर्ध्या तासाला तर बोरिवलीसाठी दर 15 मिनिटाला गाडी सोडण्यात येत आहे. मुंबईला जाणा-या प्रवाशांची स्वारगेट बसस्थानकात नेहमीच गर्दी असते. सध्या उन्हाळी सुट्टीमुळे ही गर्दी वाढली आहे. 
 
त्यामुळे प्रवाशांची सोयीसाठी एसटी प्रशासनाने बसेसच्या फे-या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वारगेट बसस्थानकातून दादरला जाण्यासाठी पूर्वी सकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत दर तासाला वातानुकूलित शिवनेरी बस सोडण्यात येत होती. 
 
दिवसभरात या मार्गावर एकूण १६ फे-या होत होत्या. आता या फे-यांमध्ये दुप्पटीने वाढ करण्यात आली असून या गाड्या दर अर्ध्या तासाला सोडण्यास सोमवारपासून सुरूवात करण्यात आल्या आहेत. सकाळी ५.३० ते रात्री १००.३० वाजेपर्यंत या फे-या होतील.
 
स्वारगेट ते बोरीवली मार्गावर पहाटे ५ ते रात्री १२.३० वाजेपर्यंत अर्ध्या तासाला बस सोडण्यात येणार आहेत. पूर्वी या मार्गावर सायनमार्गे ३२ आणि ऐरोली मार्गे १८ अशा दर तासाला एकूण ५० फे-या होत होत्या. आता सायनमार्गे व ऐरोलीमार्गे प्रत्येकी ४० अशा एकुण ८० फे-या होणार आहेत. 
 
फे-या वाढविण्यात आल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. सध्या गाड्यांना मिळणारा प्रतिसाद खूप चांगला आहे. सुट्टीचा हंगाम संपल्यानंतरही प्रवाशांच्या सोयीसाठी या फे-या सुरू ठेवल्या जातील, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
 

Web Title: An increase in ST fares due to summer vacations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.