डाळीच्या साठा मर्यादेत वाढ
By admin | Published: March 4, 2017 05:58 AM2017-03-04T05:58:03+5:302017-03-04T05:58:03+5:30
डाळींची साठवणूक मर्यादा तीन महिन्यांसाठी तिपटीने वाढविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
मुंबई : शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी राज्यातील डाळींवरील घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांकरिता सध्या लागू असलेल्या साठवणूक मर्यादा तीन महिन्यांसाठी तिपटीने वाढविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सोयाबीनला ५ नोव्हेंबर २०१६पासून साठा निर्बंधातून वगळले आहे. साठा मर्यादेत वाढ करताना पालिका क्षेत्रासाठी घाऊक व्यापाऱ्यांकरिता १०,५०० तर किरकोळ व्यापाऱ्यांकरिता ६००, अ-वर्ग नगरपालिका क्षेत्रासाठी घाऊक व्यापाऱ्यांकरिता ७,५०० तर किरकोळ व्यापाऱ्यांकरिता ४५०, तसेच उर्वरित ठिकाणी घाऊक व्यापाऱ्यांकरिता ४,५०० तर किरकोळ व्यापाऱ्यांकरिता ४५० क्विंटल साठवणुकीची मर्यादा ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)