तलावांची साठवणक्षमता वाढवा

By admin | Published: May 17, 2016 01:57 AM2016-05-17T01:57:11+5:302016-05-17T01:57:11+5:30

दौंडच्या पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची साठवण क्षमता वाढविण्यासाठी योग्य नियोजन करावे लागेल.

Increase the storage capacity of the ponds | तलावांची साठवणक्षमता वाढवा

तलावांची साठवणक्षमता वाढवा

Next


दौंड : भविष्यात पाण्याची समस्या कठीण होत जाणार आहे. तेव्हा दौंडच्या पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची साठवण क्षमता वाढविण्यासाठी योग्य नियोजन करावे लागेल. तलावांच्या खोलीकरणाची गरज असून चित्रीकरण करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनीि अधिकाऱ्यांना दिल्या.
खडकवासला धरणातून दौंडसाठी पाणी सोडल्यानंतर पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाजवळ पाण्याची परिस्थिती पाहण्यासाठी आले असता ते बोलत होते. माटोबा तलाव, वरवड येथील व्हिक्टोरिया तलावावर जावून पाणी किती आले हे पाहिले. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार राहुल कुल, शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे, दौंडचे ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया, नगराध्यक्षा अंकुशाबाई शिंदे, भाजपा किसान मोर्चाचे वासुदेव काळे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे, तानाजी दिवेकर, विकास जगताप, भाजपाचे तालुकाध्यक्ष तात्यासाहेब ताम्हाणे, तहसीलदार उत्तम दिघे, गटविकास अधिकारी संतोष हराळे उपस्थित होते. (वार्ताहर)
>एमआयडीसीचे पाणी बंद करा
वायनरीचे व एमआयडीसीचे पाणी बंद करावे, अशी मागणी वासुदेव काळे व तानाजी दिवेकर यांनी केली. नाहीतर पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहणार नाही.
माटोबा तलावाचे
खोलीकरण गरजेचे
माटोबा तलावाच्या साठवण क्षमतेत वाढ व्हावी, यासाठी तलावाची उंची वाढविण्याची मागणी तेथील काही पदधिकाऱ्यांनी केली. राहुल कुल यांनी उंची वाढविण्याऐवजी खोलीकरण केल्यास कोणाच्याही जमिनी अधिग्रहण न करता जास्तीचे पाणी साठवता येईल, अशी भूमिका मांडली. यावर बापट यांनीदेखील खोलीकरण करणे सोयीस्कर राहील, संबंधित अधिकाऱ्यांनी तलावाचे चित्रीकरण करून त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या.
ड्रेनेजचे पाणी
शेतीला द्या
दिवसेंदिवस दौंडची लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यानुसार पाण्याचे नियोजन करणे काळाची गरज आहे. शहरातील ड्रेनेजचे पाणी शेतीला दिले, तर निश्चितच त्याचा उपयोग शेतीसाठी होईल, याचाही दौंड नगर परिषदेने विचार करणे गरजेचे आहे. दौंडच्या पाण्याचा प्रस्ताव माझ्याकडे पाठवा. तो सोडविण्यासाठी योग्य ते कामकाज केले जाईल, असे शेवटी बापट म्हणाले.
पाटबंधारे अधिकाऱ्यांना घेतले फैलावर...
नाथाचीवाडी परिसरात तलावातील पाणी देण्याचे आदेश देऊनदेखील अधिकारीवर्ग पाणी देण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रार उपस्थित शेतकऱ्यांनी केल्यानंतर आमदार राहुल कुल यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून टाळाटाळ करीत असल्याबद्दल चांगलेच फैलावर घेतले.

Web Title: Increase the storage capacity of the ponds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.