राज्यात तापमानात वाढ; पारा ४० अंश सेल्सिअस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 07:28 AM2020-05-14T07:28:21+5:302020-05-14T07:28:45+5:30

सर्वाधिक उष्ण शहरांसाठीच्या यादीतील पहिल्या दहा क्रमांकामध्ये असलेल्या महाराष्ट्रातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान ४० अंशाच्या आसपास आहे.  

Increase in temperature in the state; Mercury 40 degrees Celsius | राज्यात तापमानात वाढ; पारा ४० अंश सेल्सिअस

राज्यात तापमानात वाढ; पारा ४० अंश सेल्सिअस

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्यातील शहरांच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत असून, सर्वाधिक उष्ण शहरांसाठीच्या यादीतील पहिल्या दहा क्रमांकामध्ये असलेल्या महाराष्ट्रातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान ४० अंशाच्या आसपास आहे.  
स्कायमेटकडील माहितीनुसार,
प्री मान्सून हंगामास आता दोन महिने उलटले आहेत. तिसऱ्या महिन्याची सुरुवात झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात काही राज्यात पावसाची शक्यता आहे. परिणामी, तापमानात वाढ होणार नाही. तरीही मध्य भारतात मात्र उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मालेगाव सर्वाधिक उष्ण

मालेगावची देशातील सर्वात उष्ण शहरांमध्ये नोंद होत आहे. गेल्या २४ तासांत येथे ४३.६ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य भारतातील काही शहरांचा पारा घसरला आहे. ४५ अशांपर्यंत दाखल झालेले कमाल तापमान ४३ अंशापर्यंत खाली घसरले आहे.

कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
मालेगाव (महाराष्ट्र) - ४३.६, अकोला (महाराष्ट्र) - ४३.४, जळगाव (महाराष्ट्र) - ४३, खरगौन (मध्यप्रदेश) - ४३, फलोदी (राजस्थान) - ४३,
दुर्ग (छत्तीसगढ) - ४२.८, मेडक (तेलंगणा) - ४२.६, जैसमलर (राजस्थान) - ४२.५, खंडवा (मध्य प्रदेश) - ४२.५, आदिलाबाद (तेलंगणा) - ४२.३

 

Web Title: Increase in temperature in the state; Mercury 40 degrees Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.