राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंटची वेळ वाढवा; मुख्यमंत्र्यांकडे संघटनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 09:03 AM2021-10-02T09:03:51+5:302021-10-02T09:05:33+5:30

Hotel, Restaurant Timings : कोरोनाकाळात लावलेल्या निर्बंधामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगत केली मागणी.

Increase the time of hotel, restaurants in the state Demand for organization to the cm uddhav thackeray | राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंटची वेळ वाढवा; मुख्यमंत्र्यांकडे संघटनेची मागणी

प्रातिनिधीक छायाचित्र

Next
ठळक मुद्देकोरोनाकाळात लावलेल्या निर्बंधामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगत केली मागणी.

मुंबई : कोरोनाकाळात लावलेल्या निर्बंधामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटचे मोठे नुकसान झाले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी सध्या असलेली वेळ मर्यादा हटवून रात्री १.३० पर्यंत ही पूर्ववत वेळ करावी, अशी मागणी  हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाने मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्र्यांकडे केली आहे.

देशातील सर्व क्षेत्रांपैकी पर्यटन क्षेत्राला कोरोनामुळे  सर्वाधिक फटका बसला आहे. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. आजपर्यंत देशातील ३० टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंट आर्थिक नुकसानीमुळे कायमस्वरूपी बंद झाली आहेत. २० टक्क्यांहून अधिक हॉटेल आणि रेस्टॉरंट अद्याप पूर्णपणे उघडलेली नाहीत आणि उर्वरित ५० टक्के रेस्टॉरंट तोट्यात आहेत.

हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष शेरी भाटिया म्हणाले की, भाडे आणि पगाराचा खर्च, जुन्या कर्जाची भरपाई, कमी व्यवसाय  आणि वीजबिल, वेतन, इतर शुल्क यामध्ये  सध्याच्या परिस्थितीत हॉटेल किंवा रेस्टॉरंट चालविणे अशक्य झाले आहे. व्यवसाय पुन्हा सुरू करून तो पूर्ववत करण्याचे आमचे प्रयत्न अयशस्वी  ठरत आहेत. सध्या राज्याच्या सुमारे तीन कोटी लोकसंख्येचा कोरोना लसीचा किमान एक डोस झाला आहे आणि नवीन रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. अशा परिस्थितीत आम्ही सरकारला विनंती करतो की, राज्यातील आर्थिक व्यवसाय पूर्ववत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी आणि नागरिकांना गेल्या १८ महिन्यात झालेल्या प्रचंड आर्थिक नुकसानीतून बाहेर पडण्यास मदत करावी. 

हॉटेल व्यवसायासाठी सकाळी ७ ते रात्री १०ची वेळ व्यवहार्य नाही म्हणून आम्ही सरकारला विनंती करतो की, आस्थापनेच्या परवाना वेळेनुसार आठवड्याचे सर्व दिवस रेस्टॉरंटची वेळ पूर्ववत करावी, असेही  भाटिया म्हणाले. वेळ वाढवून मिळाल्यास व्यवसाय अधिक चांगला होईल असेही सांगण्यात आले.

रेस्टॉरंटची सध्याची वेळ सकाळी ७ ते रात्री १० या व्यवसायाला पूरक नाही. सरकारने कोरोनापूर्व वेळेनुसार ती सुरू करावी. रेस्टॉरंट पुन्हा सुरू करण्यासाठी रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे लसीकरण केले जावे, या अटीवर शिथिलता द्यावी आणि प्रलंबित लसीकरण असल्यास हॉटेल आणि रेस्टॉरंटना ते क्रमाक्रमाने करण्याची परवानगी द्यावी.
प्रदीप शेट्टी,
वरिष्ठ उपाध्यक्ष, हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया

Read in English

Web Title: Increase the time of hotel, restaurants in the state Demand for organization to the cm uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.