क्षयरोग रुग्णांत होतेय वाढ
By admin | Published: October 17, 2016 04:28 AM2016-10-17T04:28:16+5:302016-10-17T04:28:16+5:30
आशिया खंडाला क्षयरोगाचा मोठ्या प्रमाणात धोका आहे. भारतातही क्षयरोग रुग्णांत वाढ होताना दिसत आहे.
मुंबई : आशिया खंडाला क्षयरोगाचा मोठ्या प्रमाणात धोका आहे. भारतातही क्षयरोग रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. २०१४ मध्ये २२ लाख क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले होते, तर २०१५ मध्ये रुग्णांमध्ये वाढ झाली असून, २८ लाख रुग्ण आढळून आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात स्पष्ट झाले आहे.
२००९ पासून बांग्लादेश, भूतान, कोरिया, भारत, इंडोनेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड या देशांत क्षयरोग रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. २०१४ मध्ये २ लाख २० हजार जणांचा मृत्यू हा क्षयरोगामुळे झाला होता, तर २०१५ मध्ये क्षयरोग्यांच्या मृत्यूत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. २०१५ वर्षात क्षयरोगामुळे ४ लाख ८० हजार क्षयरोग रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका वर्षात मृत्यूची आकडेवारी वाढली असल्यामुळे, क्षयरोगासाठी विशेष उपाययोजना आखणे आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)