शेतकऱ्यांना वाढीव मदत

By Admin | Published: March 17, 2015 01:06 AM2015-03-17T01:06:01+5:302015-03-17T01:06:01+5:30

सलग दुसऱ्या वर्षी नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील मोठ्या शेतकऱ्यांना केंद्राच्या निकषानुसार लवकरच दुष्काळाची वाढीव मदत मिळणार आहे.

Increased aid to farmers | शेतकऱ्यांना वाढीव मदत

शेतकऱ्यांना वाढीव मदत

googlenewsNext

सुनील कच्छवे ल्ल औरंगाबाद
सलग दुसऱ्या वर्षी नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील मोठ्या शेतकऱ्यांना केंद्राच्या निकषानुसार लवकरच दुष्काळाची वाढीव मदत मिळणार आहे. राज्य सरकारकडून याआधी मोठ्या शेतकऱ्यांना एक हेक्टरपर्यंतच दुष्काळी मदत देण्यात आली आहे. आता दुसऱ्यांदा संकटात सापडलेल्या मोठ्या शेतकऱ्यांना आणखी एका हेक्टरची मदत दिली जाईल. अशा शेतकऱ्यांच्या वेगळ्या याद्या तयार करण्याचे आदेश विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच देण्यात आले आहेत.
मराठवाड्यातील सुमारे ३ लाख मोठ्या शेतकऱ्यांना ही मदत मिळण्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जानेवारी महिन्यात वैयक्तिक मदतीचे पॅकेज जाहीर केले. दोन महिन्यांपासून या पॅकेजचे वाटप सुरू आहे. जिरायत क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी साडेचार हजार, बागायती क्षेत्रासाठी नऊ हजार रुपये आणि फळ पिकांखालील क्षेत्रासाठी बारा हजार रुपये याप्रमाणे ही मदत दिली जात आहे. अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या सर्व क्षेत्रासाठी, तर मोठ्या शेतकऱ्यांना केवळ एक हेक्टरपर्यंतच ही मदत जाहीर झालेली आहे. मात्र; गतवर्षी गारपिटीचा फटका बसला होता़ फेबु्रवारी २०१४मध्ये १४ लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.

च्राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना सलग दुसऱ्या संकटाचा सामना करावा लागला असेल तर मोठ्या शेतकऱ्यांनाही दोन हेक्टरपर्यंतची मदत देण्यात यावी, असा निकष आहे. मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष करून मराठवाड्यातील मोठ्या शेतकऱ्यांना एक हेक्टरपर्यंतच मदत दिली जात आहे. ‘लोकमत’ने ९ मार्च रोजीच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर राज्य सरकारने निकषांनुसार वाढीव मदत देण्याचे ठरविले आहे.

च्यंदा मराठवाड्यातील ४८ लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने विभागातील जवळपास सर्व ४३ लाख शेतकऱ्यांना मदत देऊ केली आहे. गतवर्षी १० लाख हेक्टरवरचे नुकसान झाले होते. तेव्हा विभागातील १४ लाख शेतकऱ्यांना वैयक्तिक मदत देण्यात आली होती. आता दोन्ही वर्षी नुकसान झालेल्या १४ लाख शेतकऱ्यांपैकी मोठ्या शेतकऱ्यांना वेगळे काढून त्यांना वाढीव मदत दिली जाणार आहे.

याद्या तयार करण्याचे आदेश
विभागात सलग दुसऱ्या वर्षी नुकसान झालेल्या मोठ्या शेतकऱ्यांच्या वेगळ्या याद्या तयार करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अशा शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत दुष्काळी मदत मिळणे अपेक्षित आहे. उर्वरित एका हेक्टरच्या मदतीसाठी याद्या तयार केल्या जात असल्याचे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

गारपिटीमुळे द्राक्ष, डाळींब, कांदा, गहू, हरभरा, भाजीपाला, कांदा बियाण्यांच्या झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, या मागणीसाठी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. सोमवारी शेतकऱ्यांनी चांदवड आणि दिंडोरी येथे रास्तारोको केला.
चांदवड तालुका काँग्रेसतर्फे मुंबई - आग्रा महामार्गावर पेट्रोलपंप चौफुलीजवळ माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली तर दिंंडोरीत माजी आमदार धनराज महाले, नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको करण्यात आला. आंदोलकांनी रस्त्यावर द्राक्ष ओतून व वीज बिलाची होळी केली.

Web Title: Increased aid to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.