विक्रांत केणे हत्येतील आरोपींच्या कोठडीत वाढ
By Admin | Published: June 9, 2017 03:26 AM2017-06-09T03:26:39+5:302017-06-09T03:26:39+5:30
आयरे गावातील विक्रांत केणे हत्ये प्रकरणातील ११ आरोपींची पोलीस कोठडी न्यायालयाने १२ जूनपर्यंत वाढवली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : आयरे गावातील विक्रांत केणे हत्ये प्रकरणातील ११ आरोपींची पोलीस कोठडी न्यायालयाने १२ जूनपर्यंत वाढवली आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी रवींद्र वाडेकर यांनी दिली.
जमिनीच्या तसेच झाड तोडण्याच्या वादातून ३० मे रोजी आयरे गावात विक्रांत केणे (२४) याची परवानाधारी पिस्तुलमधून गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी मुख्य आरोपी मंगेश बाळाराम भगत (२४), श्रीराम केशव भगत (४६), त्यांची मुले ओंकार (१९) व शुभम भगत (१९), पंकज म्हात्रे, प्रदीप नायडू (२४), संजय तुळवे (२०), प्रशांत पवार (२०), शशिकांत ऊर्फ शांताराम कुळे (२४), सुमित ऊर्फ लाडू चौधरी आणि स्वप्नील चौधरी या ११ जणांना पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींना न्यायालयाने ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत शुक्रवारी संपल्याने त्यांना पुन्हा कल्याण येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते.
या वेळी गुन्ह्याच्या तपास करण्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली. ती मागणी मान्य करत न्यायालयाने आरोपींना १२ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील आणखी काही आरोपी फरारी असून त्यांचाही शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, जेसीबी चालकाला केलेल्या दमदाटीप्रकरणातही भगत कंपनीची चौकशी सुरु असल्याचे सूत्रांकडून समजते.