दहीहंडीमध्ये महिलांचा वाढतोय सहभाग
By Admin | Published: August 27, 2016 01:35 AM2016-08-27T01:35:50+5:302016-08-27T01:35:50+5:30
सध्या शहरामध्ये दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
पिंपरी : सध्या शहरामध्ये दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. त्यातच महिलांच्या दहीहंड्या ह्या लक्षणीय होत्या.
संत तुकारामनगर येथे महिला पोलीस मित्र मंडळांची दहीहंडी लक्षणीय होती. यामध्ये पोलीसांच्या पत्नींनीही सहभाग घेतला होता. शहरातील प्रमुख विद्यालयात मुलींची दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयातील अनेक मुलींनी विशेष सहभाग घेतला होता.
या वेळी मानवी मनोऱ्यांची रचना लक्ष वेधून घेत होती. शहरातील महिलांच्या दहीहंडीचे विशेष आकर्षण पाहावयास मिळाले. त्यामुळे मानवी मनोऱ्यांचे तीन ते चार थर पाहावयास मिळाले.
संत तुकारामनगर येथील पोलीस मित्र मंडळ संघाच्या वतीने महिलांची दहीहंडी साजरी करण्यात आली. यात मानवी मनोऱ्यांचे चार थर करण्यात आले होते. संध्याकाळी हंडी सजवून वर चढविण्यात आले.
ठिकठिकाणी स्पीकरच्या भिंती उभ्या राहिल्या . ढोल -ताशांचे निनाद घुमू लागले. आणि खऱ्या अर्थाने उत्सवाचा साज चढविण्यात आला. या दहीहंडीचे कार्यक्रमाचे आयोजनही महिलांनीच केले होते.
(वार्ताहर)
>श्रीकृ ष्ण प्रतिष्ठानतर्फे विविध कार्यक्रम
सांगवी : श्रीकृष्ण प्रतिष्ठान कृष्णानगर चिंचवड यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने गजानन प्रासादिक भजनी मंडळांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. व ह.भ.प अंबादासमहाराज आळंदीकर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वसंतराव जेरे, गोविंद बावणे, प्रभाकर शिवयोगी, शशिकांत भैरवकर, संजय सावळे, सुदाम सावंत, किरण वावणे, सुवर्णा जरे, ऋषीकेश करंदीकर, सचिन जरे , महाराष्ट्र शिव वाहतूक सेना, विलास पवार, भारतीय विद्यार्थी सेना, सचिन सानप युवा अधिकारी, गीतांजली पवार, विभाग संघटक महिला आघाडी शिवसेना आदी उपस्थित होते.