उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2018 11:37 AM2018-04-15T11:37:58+5:302018-04-15T11:37:58+5:30
गुप्तचर विभागाने ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत दिलेल्या अहवालानंतर राज्य सरकारने तात्काळ त्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला.
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत महाराष्ट्र सरकारने अचानक वाढ केली आहे. राज्य गुप्तचर विभागाचा सुरक्षेबाबतच्या अहवालानंतर गृह विभागाने सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. गुप्तचर विभागाने ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत दिलेल्या अहवालानंतर राज्य सरकारने तात्काळ त्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांच्या सभोवताली सुरक्षा रक्षकांचा मोठा गराडा असणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सुरक्षा झेडवरुन झेड प्लस करण्यात आली आहे तर आदित्य ठाकरेंची सुरक्षा एक्सवरुन वाय प्लस करण्यात आली आहे.
गुप्तचर विभागाने गृह विभागाकडे ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत नेमका कशा प्रकारचा अहवाल दिला आहे याबाबतचा तपशील कळू शकलेला नाही. मात्र हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर लगेचच राज्य सरकारने दोघांचीही सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला.