Maharashtra Political Crisis: “मी नोकरी सोडतोय!... शिवसेनेसाठी पूर्ण वेळ काम करायचंय, उद्धवसाहेबांना पाठिंबा द्यायचाय”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 02:09 PM2022-07-29T14:09:43+5:302022-07-29T14:12:16+5:30

Maharashtra Political Crisis: २० वर्ष शाळेत काम केलेल्या शिक्षकाने नोकरीचा तडकाफडकी राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

indapur school teacher deepak popat kharat resigns to support shiv sena chief uddhav thackeray joins party | Maharashtra Political Crisis: “मी नोकरी सोडतोय!... शिवसेनेसाठी पूर्ण वेळ काम करायचंय, उद्धवसाहेबांना पाठिंबा द्यायचाय”

Maharashtra Political Crisis: “मी नोकरी सोडतोय!... शिवसेनेसाठी पूर्ण वेळ काम करायचंय, उद्धवसाहेबांना पाठिंबा द्यायचाय”

googlenewsNext

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर पक्ष वाचविण्याचे नवे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. राज्यभरातून शिंदे गटाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षाला खिंडार पडल्यानंतर आता आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेदेखील मैदानात उतरले असून, ठाकरे पिता-पुत्र ऑगस्टमध्ये राज्याचा दौरा करून शिवसेनेत पुन्हा एकदा नवचैतन्य भरणार असल्याची चर्चा सुरू आहे. यातच आता एका शिक्षकाने उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी तडकाफडकी नोकरीचा राजीनामा दिला आहे. 

पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील एका शाळेच्या शिक्षकाने उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. दीपक पोपट खरात असे राजीनामा देणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवत शिवसेना या पक्ष संघटनेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे खरात यांनी राजीनाम्यात म्हटले आहे. २७ जुलै २०२२ रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. खरातांच्या राजीनाम्याचे पत्र सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल झाले आहे.

आतापर्यंतची सेवा २० वर्ष सहा महिने

दीपक खरात हे वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित संस्थेच्या प्राथमिक शिक्षण विभागात ते कार्यरत होते. ०१ फेब्रुवारी २००२ पासून ते सेवेत आहेत. सध्या वालचंदनगर येथील पाठशाळा क्र. ३ येथे प्राथमिक शिक्षक म्हणून उपशिक्षक पदावर ते कार्यरत आहेत. त्यांची आतापर्यंतची सेवा २० वर्ष सहा महिने इतकी झालेली आहे. उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी राजीनामा देणारा बहुधा राज्यतील हा पहिलाच शिक्षक असावा. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची सध्या एकाच चर्चा सुरू आहे.

दरम्यान, नुकतेच शिंदे गटात गेलेल्या शिवसेना खासदार भावना गवळी यांचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांनी शिवसेने प्रवेश केला. तर आंबेडकरी चळवळीतील नेत्या सुषमा अंधारे यांनीही शिवबंधन हाती बांधले आहे. ज्यांना मोठे केले ते निघून गेलेत. आता सामान्य लोकांना अतिसामान्य करायचे आहे, त्यांची नसलेल्या शिवसेनेची बांधणी सुरू आहे, पण आपल्याला असलेल्या शिवसेनेची पुनर्बांधणी करायची आहे, असे आवाहनही शिवसेना कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच उपरवाले के घर देर है अंधेर नहीं, असे म्हणत शिंदे गटाला इशाराही दिला आहे.


 

Web Title: indapur school teacher deepak popat kharat resigns to support shiv sena chief uddhav thackeray joins party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.