येत्या १ नोव्हेंबरपासून 'इंडेन'च्या गॅस बुकिंगसाठी 'हा' नवीन क्रमांक असणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 17:06 IST2020-10-30T17:03:04+5:302020-10-30T17:06:18+5:30
पेट्रोलियम (बीपीसीएल) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (बीपीसीएल) कंपन्यांच्या गॅस सिलिंडर नोंदणीचे क्रमांक पूर्वीचेच राहणार आहेत.

येत्या १ नोव्हेंबरपासून 'इंडेन'च्या गॅस बुकिंगसाठी 'हा' नवीन क्रमांक असणार
पिंपरी : इंडियन ऑईल कंपनीचा इंडेन एलपीजी गॅस सिलिंडर आरक्षित करण्यासाठी असलेला क्रमांक शनिवारी (दि ३१) मध्यरात्रीपासून बंद होणार आहे. ग्राहकांनी आजपासून ७७१८९ ५५५५५ या क्रमांकाचा वापर गॅस सिलिंडर नोंदणीसाठी करावा असे आवाहन इंडियन ऑइल कंपनीकडून करण्यात आले आहे. भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (बीपीसीएल) कंपन्यांच्या गॅस सिलिंडर नोंदणीचे क्रमांक पूर्वीचेच आहेत.
ग्राहकांना स्वयंपाक गॅस सिलिंडर आरक्षित करण्यासाठी पूर्वी सारखे रांगेत उभे रहावे लागत नाही. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकवरून सिलिंडर आरक्षित करता येतो. ग्राहकांचा मोबाईल क्रमांक पूर्वीच नोंदलेला असेल तर ग्राहकांना त्यांचा १६ आकडी ग्राहक क्रमांक सूचित केले जाईल. मोबाईल क्रमांक नोंदणीकृत केला नसल्यास सोळा आकडी ग्राहक क्रमांकापुर्वी ७ आकडा नोंदवून मोबाईल क्रमांक खात्याला जोडावा. गॅस सिलिंडर पावती, गॅस नोंदणी पुस्तिका यावर सोळा आकडी ग्राहक क्रमांक मिळेल, अशी माहिती इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्यांनी दिली.