महिलांसाठी आजपासून स्वतंत्र बससेवा

By admin | Published: July 13, 2017 01:36 AM2017-07-13T01:36:04+5:302017-07-13T01:36:04+5:30

पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.

Independent bus service for women today | महिलांसाठी आजपासून स्वतंत्र बससेवा

महिलांसाठी आजपासून स्वतंत्र बससेवा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची मागणी लावून धरल्यानंतर पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. निगडी येथून पीएमपीएमएलची वातानुकूलित बस सुरू केली आहे. गुरुवारपासून निगडी येथून महिलांसाठी स्वतंत्र बस सुरू करण्यात येणार आहे.
स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहराला पीएमपीएमएलमार्फत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविली जाते. त्या मोबदल्यात या दोन्ही महापालिका पीएमपीएमएलला दरवर्षी कोट्यवधींचा निधी देतात. मात्र सेवा पुरविताना पीएमपीएमएलकडून पिंपरी-चिंचवडवर अन्याय होत असल्याबाबत स्थायी समिती सभेत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. पीएमपीएमएलने गेल्या दहा वर्षांत पिंपरी-चिंचवडमधील अंतर्गत बसव्यवस्था सक्षम करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसून वाहतुकीवरचा ताण वाढला आहे, अशी तक्रार सदस्यांनी केली होती. याच मुद्द्यावरून सावळे यांनी पीएमपीएमएल प्रशासनाला धारेवर धरले होते.
पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पिंपरी-चिंचवडमधील अंतर्गत भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी आणि महिलांसाठी स्वतंत्र बसेस सुरू कराव्यात, तोपर्यंत पीएमपीसंदर्भातील कोणताही विषय मंजूर करणार नाही, अशी भूमिका सावळे यांनी घेतली होती. त्यानंतर मुंढे यांनी पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांना चहापानाचे निमंत्रण देऊन चर्चा केली होती. व तीन महिन्यांत पीएमपी सक्षम करण्यासाठी निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते.
>निगडी येथून पीएमपीएमएलची वातानुकूलित बस सुरू केली आहे. गुरुवारी निगडी येथून महिलांसाठी स्वतंत्र बस धावणार आहे. याशिवाय मोशी, स्पाइन रोड येथील सेक्टर क्रमांक १३ येथून प्रथमच बस सुरू केली जाणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील अंतर्गत बसव्यवस्था सुधारण्यासाठी लवकरच ८० मिनीबस सुरू करण्याचे नियोजन पीएमपीएमएल प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या सभेत बुधवारी मुंढे यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

Web Title: Independent bus service for women today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.