तंबाखुसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा
By admin | Published: April 10, 2015 04:02 AM2015-04-10T04:02:24+5:302015-04-10T04:02:24+5:30
सिगरेटच्या पाकिटावर ६० ते ८५ टक्के भागात दोन्ही बाजूला सिगरेट आरोग्यास हानिकारक आहे असा संदेश देणारे चित्र छापण्याबाबतची सक्ती करण्यात यावी
मुंबई : सिगरेटच्या पाकिटावर ६० ते ८५ टक्के भागात दोन्ही बाजूला सिगरेट आरोग्यास हानिकारक आहे असा संदेश देणारे चित्र छापण्याबाबतची सक्ती करण्यात यावी अशी शिफारस राज्य सरकार केंद्राकडे करून तंबाखू बंदीसाठी राज्यात स्वातंत्र्य कायदा करण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत दिले.
तसेच, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यांवर कठोर कारवाई करणारा कायदा लवकरच केला जाईल,असेही डॉ. सावंत यांनी सांगितले. तंबाखूपासूनचे अपाय आणि ते रोखण्यासाठीच्या उपायांबाबत भाजपाचे आशिष शेलार यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तासाच्या चर्चेला उत्तर देताना सावंत यांनी सांगितले की, मुंबई उपनगरात किमोथेरेपी सेंटर सुरु करण्यात येईल, राज्यात ४ झोन मध्ये कँन्सर हॉस्पिटल नव्याने उभारण्यात येतील. तसेच मुंबईतील टाटा रूग्णालया बाहेर फुटपाथवर अनेक नातेवाईक राहतात त्यांच्यासाठी शेल्टर होम बांधण्यात येणार आहे. तंबाखू सेवनाने कॅन्सर होत नाही, असे वादग्रस्त विधान भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी केलेले असतानाच शेलार यांनी मात्र तंबाखूच्या अपायांवर प्रकाश टाकला. (विशेष प्रतिनिधी)