एकटे पडलेल्या मुख्यमंत्र्यांसोबत अपक्ष आमदार रवी राणांची जवळीक !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 12:32 PM2019-11-05T12:32:17+5:302019-11-05T12:33:02+5:30

राणा हे आघाडीचा पाठिंबा घेऊन अपक्ष निवडून आले आहेत. तर त्यांच्या पत्नी नवनीत कौर राणा या लोकसभेवर खासदार आहेत. त्या देखील आघाडीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या आहेत. मात्र भाजपशी जवळीक झाल्याने हे दांपत्य लवकरच भाजपमध्ये जाईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. 

Independent MLA Ravi Rani's close relationship with the chief minister alone! | एकटे पडलेल्या मुख्यमंत्र्यांसोबत अपक्ष आमदार रवी राणांची जवळीक !

एकटे पडलेल्या मुख्यमंत्र्यांसोबत अपक्ष आमदार रवी राणांची जवळीक !

Next

मुंबई - सध्या मुख्यमंत्री पदावरून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. शिवसेना 50-50 च्या फॉर्म्युल्यावर अडून बसली असून भाजप मुख्यमंत्रीपदासह महत्त्वाची खाते आपल्याकडे ठेवण्यास प्रयत्नशील आहे. यावरून ही जुगलबंदी आणखीच ताणली जात आहे. शिवसेनेकडून खासदार संजय राऊत बॅटींग करत आहेत. तर भाजपकडून अपक्ष आमदार रवी राणा यांनी सुत्र हाती घेतल्याचे दिसत आहे. 

विधानसभा निवडणुकीत भाजपमधील अनेक दिग्गज नेत्यांना तिकीट नाकारण्यात आले. यामध्ये एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांचा समावेश आहे. तर पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव झाला आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या गैरहजेरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे पडल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीला रवी राणा धावून आले आहेत. 

मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेनेची आक्रमकता संजय राऊत हे वेळोवेळी दाखवून देत आहेत. त्याला भाजपमधून फारसं कोणी उत्तर देताना दिसत नाही. मात्र भाजपला पाठिंबा देऊन मुख्यमंत्र्यांशी जावळीक साधणारे रवी राणा शिवसेनेला प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. राणा यांनी संजय राऊत यांच्यावर कडाडून टीका केली आहे. शिवसेनेचे 25 आमदार संपर्कात असल्याचा दावा राणा यांनी केला होता. तसेच उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर अंकुश ठेवायला हवं असंही सल्लाही त्यांनी शिवसेनेला दिला होता. यावरून एकटे पडलेल्या फडणवीसांना राणा यांची साथ मिळत आहे.  तर राणा यांची फडणवीस यांच्याशी जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. 

राणा हे आघाडीचा पाठिंबा घेऊन अपक्ष निवडून आले आहेत. तर त्यांच्या पत्नी नवनीत कौर राणा या लोकसभेवर खासदार आहेत. त्या देखील आघाडीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या आहेत. मात्र भाजपशी जवळीक झाल्याने हे दांपत्य लवकरच भाजपमध्ये जाईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. 
 

Web Title: Independent MLA Ravi Rani's close relationship with the chief minister alone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.