'आठ दिवसांत उद्धव ठाकरेंची माफी न मागितल्यास...', नवनीत राणा यांना पत्राद्वारे धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 05:07 IST2021-02-17T05:07:06+5:302021-02-17T05:07:29+5:30
Independent MP Navneet Ravi Rana gets threat letter, case registered : मराठी भाषेत लिहिण्यात आलेले ते पत्र नवनीत राणा यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानासमोर आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.

'आठ दिवसांत उद्धव ठाकरेंची माफी न मागितल्यास...', नवनीत राणा यांना पत्राद्वारे धमकी
अमरावती : ठाकरे सरकारच्या कारभारावर टीका करणाऱ्या खा. नवनीत राणा यांना आठ दिवसांत उद्धव ठाकरे यांची माफी न मागितल्यास चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे. हे पत्र शिवसेनेच्या लेटरहेडवर आहे. खा. राणा यांनी दिल्लीच्या नाॅर्थ एव्हिन्यू पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
मराठी भाषेत लिहिण्यात आलेले ते पत्र नवनीत राणा यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानासमोर आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रातील भाषा अत्यंत अश्लाघ्य आहे. शिवाय, ‘शिवसेना स्टाइल’ने सांगावे लागेल, अशी धमकी पत्रातून देण्यात आली आहे. संबंधित पत्रात बडनेराचे आ. रवी राणा यांनाही धमकी देण्यात आली आहे.