नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे स्वतंत्र कार्यालय

By Admin | Published: July 9, 2016 12:58 AM2016-07-09T00:58:46+5:302016-07-09T00:58:46+5:30

नाशिक महानगर विकास प्राधिकरणासाठी (एनएमआरडीए) २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, एनएमआरडीएचे नाशिकला स्वतंत्र कार्यालय करण्यास मुख्यमंत्री

Independent Office of Nashik Metropolitan Development Authority | नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे स्वतंत्र कार्यालय

नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे स्वतंत्र कार्यालय

googlenewsNext

नाशिक : नाशिक महानगर विकास प्राधिकरणासाठी (एनएमआरडीए) २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, एनएमआरडीएचे नाशिकला स्वतंत्र कार्यालय करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मंजुरी दिली.
तूर्तास नाशिक महानगर नियोजन प्राधिकरणाचा कारभार सिडको कार्यालयातून चालविण्यासही संमती देण्यात आली. मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहावर शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एनएमआरडीए पहिलीच बैठक झाली. बैठकीत नाशिक येथे स्वतंत्र कार्यालय, त्यासाठी निधीची तरतूद तसेच शहराजवळच्या सहा तालुक्यांच्या प्रारूप विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली. समितीचे कामकाज जिल्हा नियोजन समितीप्रमाणेच चालणार असून, त्यासाठी आयएएस अधिकाऱ्याचीही लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे. या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्यमंत्री, तर प्रधान सचिव व विभागीय आयुक्त हे सचिव राहणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Independent Office of Nashik Metropolitan Development Authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.