स्वतंत्र गुणवत्ता यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2016 01:12 AM2016-08-24T01:12:06+5:302016-08-24T01:12:06+5:30

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

Independent quality list | स्वतंत्र गुणवत्ता यादी

स्वतंत्र गुणवत्ता यादी

Next


पुणे : राज्य सामाईक प्रवेश चाचणी कक्षाकडून खासगी व अभिमत विद्यापीठांशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
‘नीट’ परीक्षेतील गुणांच्या आधारे खासगी व अभिमत विद्यापीठांतील एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेश दिले जाणार आहेत. याबाबत कक्षाकडून खासगी व अभिमतसाठी स्वतंत्रपणे परिपत्रक काढले. मात्र, या दोन्ही परिपत्रकांमुळे विद्यार्थी-पालक व संस्थांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही संस्थांसाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र लिंक देऊन स्वतंत्र माहिती भरण्यास सांगितली आहे. असे असले तरी स्वतंत्र गुणवत्ता यादीद्वारे प्रवेश होणार की एकच यादी लागणार, याबाबत कुठेही स्पष्ट करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. त्यातच वैद्यकीय शिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांकडून सोमवारी स्पष्ट माहिती मिळत नव्हती.
डॉ. शिनगारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अभिमत व खासगी संस्थांची स्वतंत्र गुणवत्ता
यादी लावणार असल्याचे स्पष्ट
केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतंत्र
अर्ज भरावा लागणार आहे.
त्यासाठी बुधवारी अखेरची
मुदत आहे.
ही मुदत वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांसह संस्थांकडूनही होत आहे. मात्र, प्रवेशासाठी अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचेही डॉ. शिनगारे यांनी सांगितले.
>‘अभिमत’बाबत अद्याप अस्पष्टता
अभिमत संस्थेमध्ये प्रवेशासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असली तरी त्याबाबत अजूनही अस्पष्टता आहे. याविषयी बोलताना भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक सावजी म्हणाले, ‘‘अभिमत विद्यापीठांची प्रवेशप्रक्रिया राज्य शासनाकडून राबविण्यास आमचा विरोध नाही. मात्र, काही बाबी अद्याप स्पष्ट करण्यात आलेल्या नाही. विद्यापीठांमध्ये संपूर्ण देशभरातील विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे गुणवत्ता यादी जाहीर करताना ती देशपातळीवरील असेल की राज्यापुरती मर्यादित असेल, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. अभिमत विद्यापीठांचे शुल्क हे संंबंधित समितीकडून मान्य करून घेण्यात आलेले असते. अभिमत विद्यापीठांच्या विनाअनुदानित महाविद्यालयांना आरक्षणाचा नियम लागू होत नाही. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया राबविताना यांसह सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. याबाबत राज्य शासनाकडून काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही, असे डॉ. सावजी यांनी सांगितले.

Web Title: Independent quality list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.