प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 03:37 AM2019-06-05T03:37:18+5:302019-06-05T03:37:22+5:30

ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीच्याबाबतच्या आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित ज्येष्ठ नागरिक समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

Independent rooms for junior in every district | प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र कक्ष

प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र कक्ष

Next

मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीच्याबाबतच्या आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित ज्येष्ठ नागरिक समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, समाज कल्याण आयुक्त मिलींद शंभरकर आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आरोग्य विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठांसाठी विशेष आरोग्य शिबिरे घ्यावीत. वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांमध्ये वृद्धांसाठी पाच टक्के खाटांची सोय करावी. ज्येष्ठांसाठी नगरविकास व ग्रामविकास विभागामार्फत देखभाल व विरंगुळा केंद्र स्थापन करणार असल्याची माहिती बडोले यांनी दिली. वृद्धांना आश्रय देणाऱ्या व त्याची देखभाल करणाºया पाल्यांना आयकरात सूट देण्यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच केंद्र सरकाकडे पाठविला जाईल, असेही ते म्हणाले.

Web Title: Independent rooms for junior in every district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.