गुप्त वार्ता विभागात स्वतंत्र टेक्निकल पोलीस उपायुक्ताची नियुक्ती होणार
By admin | Published: April 13, 2017 12:56 AM2017-04-13T00:56:05+5:302017-04-13T00:56:05+5:30
गुप्त वार्ता विभागाचा (एसआयडी) कणा समजल्या जाणाऱ्या तांत्रिक विभागातील अधिकारी पदाची कमतरता काही प्रमाणात कमी होणार आहे.
मुंबई : गुप्त वार्ता विभागाचा (एसआयडी) कणा समजल्या जाणाऱ्या तांत्रिक विभागातील अधिकारी पदाची कमतरता काही प्रमाणात कमी होणार आहे. या शाखेसाठी एक पोलीस अधीक्षक/उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यासह चार पदे वर्ग करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये एक उपअधीक्षक व दोन उपनिरीक्षक पदांचा समावेश आहे. एसआयडीकडून पाठविण्यात आलेल्या त्याबाबतच्या प्रस्तावाला गृह विभागाने हिरवा कंदील दिल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
- टेक्निकल शाखेसाठी दोन उपायुक्त, दोन उपअधीक्षक व सहा उपनिरीक्षक दर्जाची पदे मंजूर करण्यात आली होती. परंतु, अधिकारी देण्यात आले नव्हते. त्यामुळे पदे त्वरित भरण्याचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविण्यात आला होता.