भारत-आॅस्ट्रेलिया कसोटी पुण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2016 08:09 PM2016-10-21T20:09:39+5:302016-10-21T20:09:39+5:30
पुण्यातील स्टेडियमला नव्याने कसोटी स्थळाचा दर्जा बहाल होताच तेथे भारत- आॅस्ट्रेलिया यांच्यात पुढील वर्षी २३ फेब्रुवारीपासून कसोटी सामन्यांचे आयोजन होणार आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ : पुण्यातील स्टेडियमला नव्याने कसोटी स्थळाचा दर्जा बहाल होताच तेथे भारत- आॅस्ट्रेलिया यांच्यात पुढील वर्षी २३ फेब्रुवारीपासून कसोटी सामन्यांचे आयोजन होणार आहे. या मालिकेत एकूण चार सामने खेळविले जातील.
बीसीसीआय-क्रिकेट आॅस्ट्रेलिया यांनी शुक्रवारी गावस्कर-बॉर्डर चषक मालिकेच्या वेळापत्रकाची घोषणा केली. आॅस्ट्रेलिया संघासाठी हा दौरा अत्यंत व्यस्त असेल. पुण्यात २३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत पहिला कसोटी सामना खेळला जाईल. दुसरा सामना ४ ते ८ मार्च या कालावधीत बेंगळुरु येथे, तिसरा सामना १६ ते २० मार्चदरम्यान रांची येथे आणि चौथा सामना २५
ते २९ मार्च या कालावधीत धर्मशाला येथे खेळला जाईल.
नोव्हेंबर महिन्ययात इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर येत आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय संघ पाच कसोटी सामने खेळेल. याशिवाय तीन वन डे आणि तीन टी-२० सामनेदेखील खेळविले जातील. इंग्लंडच्या भारत दौऱ्याचा समारोप एक फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर ८ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत बांगलादेश विरुद्ध एकमेव कसोटी हैदराबाद येथे खेळविली जाईल. आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताची मालिका म्हणजे २०१६-१७ या मोसमाचा भारतात शेवट असेल