India China Face Off: लोकहो! चायनिज पदार्थांवरही बहिष्कार टाका; रामदास आठवलेंचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 01:23 PM2020-06-18T13:23:15+5:302020-06-18T13:27:15+5:30
सीमाभागात तणावाचे वातावरण असून भारतीय सैन्याने काही गावे रिकामी केली आहेत. तर चीनच्या बाजुनेही सीमेपासूनचा 15 किमीचा परिसर रिकामा करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : चीनच्या राजदूतासोबत 'गो कोरोना गो' घोषणा देणारे केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी आज देशवासियांना चायनिज पदार्थांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
सोमवारी चीनने भारतीय जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये 20 जवान शहीद झाले होते. यामुळे देशभरात चीनविरोधी लाट उसळली आहे. ठिकठिकाणी चीनी मालाची होळी व आंदोलने केली जात आहेत. याचा धसका चीनी कंपन्यांनीही घेतल्याचे काल दिसून आले. चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोने काल एका ५ जी फोनच्या सिरीजचा लाईव्ह लाँचिंग इव्हेंट रद्द केला.
सीमाभागात तणावाचे वातावरण असून भारतीय सैन्याने काही गावे रिकामी केली आहेत. तर चीनच्या बाजुनेही सीमेपासूनचा 15 किमीचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. चीनकडून पुन्हा दगाफटका होण्याची शक्यता असल्याने नौदलानेही गस्त वाढविली असून भारतीय जवानही मोठ्या संख्येने सीमेवर नेण्यात येत आहेत.
आज शहीद झालेल्या जवानांवर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. या ठिकाणी मोठी गर्दी झाली असून संतापाचे वातावरण आहे. दोन दिवसांपासून देशात चीनी मालावर बहिष्कार टाकण्याची मागणीही जोर धरू लागला आहे. कॅटने तर 500 चीनी वस्तूंवर बंदी आणण्याची मागणी सरकारकडे केली आहे. आज टेलिकॉम मंत्रालयाने बीएसएनएल, एमटीएनएलला चीनी उपकरणे खरेदी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
Restaurants selling Chinese food should be banned. I appeal to people to boycott Chinese food: Union Minister Ramdas Athawale pic.twitter.com/PoY0Udfule
— ANI (@ANI) June 18, 2020
या साऱ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी चीन धोकेबाज असून चायनिज खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या भारतील सर्व हॉटेलांवर बंदी आणायला हवी. लोकांनी चायनिज खाद्यपदार्थांवर बहिष्कार घालावा अशी मागणी केली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
चीनला सॅमसंगचा मोठा धक्का; OLED डिस्प्ले प्रकल्पच भारतात उभारणार
नागिन २ मधील अभिनेत्री चाहत पांडेला अटक; मामाच्या घरामध्ये केला 'तमाशा'
काँग्रेसचे नाराज मंत्री आज मुख्यमंत्र्यांना भेटणार; खदखद व्यक्त करणार
India China Face Off: ओप्पोने घेतला 'बायकॉट'चा धसका; Find X2 चे लाईव्ह लाँचिंगच केले रद्द
India China Face Off: चीनच्या वर्मावरच बोट; केंद्र सरकार टेलिकॉम उपकरणांचे मोठे कंत्राट रद्द करणार
यंदा मला जिंकवा! डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितली चीनकडे मदत