India China FaceOff: "सीमेवरील तणाव निवळल्यानंतर 'ते' ५०२० कोटींच्या गुंतवणुकीचे प्रकल्प मार्गी लागणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 06:15 AM2020-06-25T06:15:31+5:302020-06-25T06:16:15+5:30

सरकारने १५ जूनला १६ हजार कोटींचे १२ महत्वाचे औद्योगिक गुंतवणूक करार केले होते.

India China FaceOff: "Once the border tensions are resolved, an investment project worth Rs 5,020 crore will be launched." | India China FaceOff: "सीमेवरील तणाव निवळल्यानंतर 'ते' ५०२० कोटींच्या गुंतवणुकीचे प्रकल्प मार्गी लागणार"

India China FaceOff: "सीमेवरील तणाव निवळल्यानंतर 'ते' ५०२० कोटींच्या गुंतवणुकीचे प्रकल्प मार्गी लागणार"

Next

मुंबई : चीनमधील कंपन्यांशी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी केलेले ५०२० कोटी रुपयांचे सामंजस्य करार पूर्णत्वास जातील, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी स्पष्ट केले. सीमेवरील तणाव निवळण्याची चिन्हे असल्याने या प्रकल्पात अडचण येणार नाही असे ते म्हणाले. सरकारने १५ जूनला १६ हजार कोटींचे १२ महत्वाचे औद्योगिक गुंतवणूक करार केले होते. त्यात हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स (फोटोन सोबत संयुक्त भागीदारी) आणि ग्रेट वॉल मोटर्स या चिनी कंपन्यांच्या अनुक्रमे २५०कोटी, १ हजार कोटी आणि ३ हजार ७७० कोटींच्या करारांचा समावेश होता. हे करार भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर जैसे थे ठेवले होते. दोन्ही देशांचे संबंध पूर्ववत होतील असे दिसत असल्याने अंमलबजावणीत अडथळे येणार नाहीत असे वाटत असल्याचे देसाई म्हणाले.
>उद्योग विभागाने बुधवारी हजार कोटींच्या गुंतवणुकीचे दोन करार केले. डीबीजी इस्टेट कंपनीशी ९०० कोटींचा करार झाला. त्यातून २७०० नोकऱ्या मिळतील. ही कंपनी अमेझॉन, फ्लिपकार्ट आदी कंपन्यांसाठी भिवंडीत लॉजिस्टिक पार्क उभारेल. कंपनी सुपा येथेही उद्योग सुरू करणार आहे.

Web Title: India China FaceOff: "Once the border tensions are resolved, an investment project worth Rs 5,020 crore will be launched."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.