भारतात हिंदू शासनव्यवस्था हवी !
By admin | Published: June 5, 2014 01:34 AM2014-06-05T01:34:59+5:302014-06-05T01:34:59+5:30
अखिल भारतीय हिंदू अधिवेशन यशस्वी व्हावे, असे शुभाशीर्वाद पुरी पीठाधीश्वर श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य श्री स्वामी निश्चलानंदसरस्वतीजी महाराज यांनी दिले.
Next
>शंकराचार्य : पाश्चात्त्य राष्ट्रांची छाप दूर करून वेदांचा आधार घ्या
गोवा : भारतीय व्यवस्थांवरील पाश्चात्य राष्ट्रांची छाप दूर करणो, तसेच शिक्षणपद्धती आणि सामाजिक-सांस्कृतिक प्रकल्प वेदांच्या आधारे कार्यान्वित करणो, या मार्गांद्वारेच भारतवर्षात हिंदु राष्ट्र प्रत्यक्षात येईल. या हेतूने गोवा येथे होत असलेले तृतीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशन यशस्वी व्हावे, असे शुभाशीर्वाद पुरी पीठाधीश्वर श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य श्री स्वामी निश्चलानंदसरस्वतीजी महाराज यांनी दिले.
2क् ते 26 जून या कालावधीत गोवा येथे होत असलेल्या राष्ट्रस्तरीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने ंिहदु जनजागृती समतिीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारु दत्त पिंगळे यांनी रतनपूर (छत्तीसगढ) येथे महाराजांचे आशीर्वाद घेतले. त्या वेळी ते बोलत होते. शंकराचार्य या वेळी म्हणाले, आजच्या आधुनिक युगातही विश्वाला रामराज्य देणारा हिंदू धर्म हा दार्शनिक, व्यावहारिक आणि वैज्ञानिक तत्त्वांवर सर्वोत्कृष्ट आहे. सध्याच्या राज्यकत्र्याचा हा विकास नैर्सिगक साधनसंपत्तीचा विनाश करणारा आणि जगाला विनाशाच्या खाईत लोटणारा भस्मासुर आहे. त्यापासून वाचण्यासाठी भारत, भूतान आणि नेपाळ या देशांत हिंदु संस्कृतीनुसार शासनव्यवस्था स्थापित होणो आवश्यक आहे. योगगुरु रामदेवबाबा यांनीही मुंबई येथे तृतीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचे प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत.