दहशतवाद संपवायचा असेल तर भारताने पाकिस्तानला संपवावे : प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 02:12 PM2019-06-06T14:12:18+5:302019-06-06T14:14:14+5:30
सोलापूर : भारताला सातत्याने दहशतवादाला सामोरे जावे लागत आहे. आपल्या देशातील दहशतवाद संपवायचा असेल तर भारताने जागतिक स्तरावरील बंधनाचा ...
सोलापूर : भारताला सातत्याने दहशतवादाला सामोरे जावे लागत आहे. आपल्या देशातील दहशतवाद संपवायचा असेल तर भारताने जागतिक स्तरावरील बंधनाचा विचार न करता पाकि स्तानला संपवावे असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ यावेळी बहुजन वंचित आघाडीचे प्रदेश प्रवक्ता आनंद चंदनशिवे आदी मान्यवर व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्ही १४ टक्के मते मिळवली. त्यामुळे आम्हीच मुख्य विरोधक आहोत. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार आमच्यासेबत आला नाही. शेवटच्या क्षणी हा मतदार आमच्यापासून दूर गेला. औरंगाबाद येथे इम्तियाज जलील निवडून आल्याने मुस्लिम समाजात चांगला संदेश गेला आहे.